NCB Action in Surat : सुरतमध्ये नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने 1.45 कोटी रुपये किमतीचा 724 किलो गांजा जप्त केला आहे, माहितीनुसार, हा गांजा ओडिशाहून ट्रकमध्ये तस्करी करून सुरतला आणला जात होता. एनसीबीने (NCP) अमली पदार्थांची तस्करी करण्याआलेल्या सहा जणांना अटक केली आहे. एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. "एनसीबीच्या पथकाने (सुरतमध्ये) अंमली पदार्थांची डिलिव्हरी सुरू असताना ट्रक तसेच मालाचा रिसीव्हर थांबवला, या रिसीव्हरसह सहा जणांना दोन वाहने आणि एक लाख रुपयांच्या रोख रकमेसह अटक करण्यात आली आहे.


याप्रकरणी एनसीबीने काय म्हटले?


नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सांगितले की, माल जप्त केल्याने अंमली पदार्थांच्या पुरवठा साखळीवर आणि गुजरातमधील गांजाच्या तस्करीत गुंतलेल्या मोठ्या आंतरराज्य नेटवर्कवर परिणाम होईल. एनसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही अधिकृतपणे माहिती देऊ शकत नाही, परंतु जप्त केलेल्या अमली पदार्थांची किंमत बाजारात 20,000 रुपये प्रति किलो असल्य़ाची माहिती मिळत आहे. सध्या जप्त केलेल्या मालाची किंमत सुमारे 1.45 कोटी रुपये आहे. एनसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) ने जूनमध्ये गुजरातमध्ये बंदी घातलेले पदार्थ जप्त करण्याची ही तिसरी मोठी कामगिरी आहे.


कोणाला अटक झाली?


पोलिसांनी फारुख चांद शेख, फरहान नासीर पठाण, अरुण तिनस गौडा, हेमराज भिखान ठाकरे, साबीर शेख आणि साकील शेख यांना अटक केली आहे. शहराचे पोलिस आयुक्त अजय तोमर म्हणाले, “शहरात बंदी असूनही अमली पदार्थ शहरात आणण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरत आहेत. आम्ही विविध ड्रग डीलिंग नेटवर्कला लक्ष्य केले आहे आणि यापूर्वी अनेक अटक केली आहेत."


या महिन्यातील तिसरी मोठा जप्ती


एनसीबीने या महिन्यात गुजरातमध्ये बंदी घातलेल्या पदार्थाची ही तिसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी, एनसीबीने दक्षिण गुजरातमध्ये एका कारखान्याचा पर्दाफाश करून 68 किलो अमली पदार्थ जप्त केले होते. दुसऱ्या एका कारवाईत त्याने अहमदाबादमध्ये 523 किलो गांजा जप्त केला.