Solapur Pandharpur crime news : पंढरपूर (Pandharpur) शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. कुंभार गल्लीमध्ये रात्री साडेनऊच्या सुमारास आई आणि मुलाची राहत्या घरी निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेनंतर तातडीने पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी तपास सुरु केला आहे.
हत्येबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही
कुंभार गल्लीत राहणाऱ्या लखन जगताप आणि त्याची आई सुरेखा जगताप यांना त्यांच्या राहत्या घरी धारदार शस्त्राने मारण्यात आले आहे. त्यामध्ये लखनच्या पाठीवर आणि डोक्यावर वार झाले आहेत. तर आई सुरेखा जगताप त्यांच्या मानेवर व डोक्यावर वार करून त्यांना मारण्यात आले आहे. लखन आणि सुरेखा जगताप यांची हत्या नक्की कोणी केली ? कुठल्या कारणावरुन झाली? याबाबत कुठलीच ठोस माहिती अद्याप पुढे आली नाही. घटनेनंतर तातडीने पोलीस पथके घटनास्थळी दाखल झाली असून पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी तपास सुरू केला आहे.
मंगळवेढ्यातही धक्कादायक घटना, प्रियकराच्या मदतीने विवाहितेचा आत्महत्येचा बनाव
मंगळवेढा तालुक्यातील पाठकळ येथे एका विवाहितेचा जळीत मृतदेह आढळला. नंतर संबंधित विवाहिताच जिवंत असल्याचे समोर आले. मात्र या विवाहितेने प्रेमासाठी प्रियकराच्या मदतीने तिसऱ्याच महिलेची हत्या करून स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचला. अगदी हिंदी सस्पेन्स चित्रपटाला शोभेल अशी घटना पोलिसांनी उघडकीस आणली आहे. यामध्ये जाळलेली महिला कोण याचा पोलिस शोध घेत असून विवाहिता आणि तिचा प्रियकर अटकेत आहेत. एखाद्या हिंदी सस्पेन्स चित्रपटाला साजेल अशी मृत्यूची थरारक आणि ट्विस्टपूर्ण घटना मंगळवेढ्यात घडली. मंगळवेढ्यातील पाटकळमध्ये एका विवाहितेचा जळीत अवस्थेतील मृतदेह सापडला. घरासमोरील गवताच्या गंजीत जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या या मृतदेहामुळे घरातील विवाहित सूनेनेच आत्महत्या केल्याचे सर्वांना वाटले. पोलिसांनी फोनची सीडीआर चेक केल्यानंतर त्यांना एका तरुणावर संशय आला. पोलिसांनी लगेच या तरुणाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी सुरू केली. सुरुवातीला या प्रियकराने आपणच या विवाहितेची हत्या केल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी त्याला घटनास्थळी घेऊन जाऊ लागले असता त्याने पुन्हा घटनेची खरी कबुली दिली. ज्या विवाहितेची हत्या झाली आहे ती मेलेली नसून जिवंत आहे अशी माहिती त्याने दिल्यानंतर पोलिसही बुचकळ्यात पडले.
महत्वाच्या बातम्या:
शॉकिंग! अज्ञान व्यक्तीने महिलेच्या घरात घुसून गळा चिरला; हत्याकांडाने सातारा हादरला, पोलीस तात्काळ धावले