Solapur Crime: सोलापूर (Solapur) शहरातील अभिषेक नगरमधील अवंती हौसिंग सोसायटीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास अडीचच्या वेळेस सशस्त्र चोरट्यांनी केलेली जबरी चोरी शहरात खळबळ माजवणारी ठरली आहे. शस्त्रधारी टोळीने घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश करत नागरिकांना वेठीस धरून लुट केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Continues below advertisement


प्राथमिक माहितीनुसार, चोरट्यांनी एका घरात घुसून लहान मुलाच्या गळ्याला चाकू लावला आणि घरमालक पुरुषाला मारहाण करत सोनं व रोख रक्कम जबरदस्तीने लुटली. यानंतर ते खालच्या मजल्यावरील दुसऱ्या घरात घुसले, तिथेही तशाच प्रकारे धमकी देऊन चोरी केली.


Solapur Crime: गळ्याला चाकू लावून धमकावलं


पीडित कुटुंबातील पूजा अन्नदाते आणि स्नेहा राजपूत यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, “रात्री अचानक काही लोक घरात घुसले आणि गळ्याला चाकू लावून धमकावलं. आमच्या नवऱ्याला मारहाण करत घरातील सोनं व पैसे लुटले. आम्ही अत्यंत घाबरले होतो. त्यानंतर ते चोरटे खालच्या घरात गेले आणि तिथेही तसंच केलं.”


Solapur Crime: चोरटे अंधारात पळून जाण्यात यशस्वी


या घटनेत चोरट्यांनी दोन घरे फोडण्यात यश मिळवले असले तरी, पोलिसांची वेळेवर हजेरी लागल्यामुळे इतर घरे लुटण्याचा प्रयत्न फसला. चोरटे अंधारात पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत, मात्र पोलीस त्यांच्या मागावर आहेत.


Solapur Crime: पोलीस तपास सुरू


घटनेची माहिती मिळताच सोलापूर गुन्हे शाखेच्या उपायुक्त आश्विनी पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्यासोबत फॉरेन्सिक तज्ज्ञ व गुन्हे शाखेचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले असून, पुरावे गोळा करण्यात येत आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.


Solapur Crime: नागरिकांत भीतीचे वातावरण


या प्रकारामुळे सोलापूर शहरात पुन्हा एकदा सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अभिषेक नगर भागात झालेली ही सशस्त्र चोरी अत्यंत गंभीर मानली जात असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांना या प्रकरणातील आरोपींना जेरबंद करण्यात यश कधी मिळणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 



इतर महत्त्वाच्या बातम्या 


Fake Currency: मिरजमध्ये हवालदाराच्या चहाच्या दुकानात छापल्या एक कोटींच्या नोटा, कलर झेरॉक्स मशीनवर...., नेमकं प्रकरण काय?


Mumbai Underworld : 'गुंतवणूकदाराला धमकावलं', छोटा राजनचा साथीदार कुख्यात गुंड डीके रावला गुन्हे शाखेकडून अटक, रिअल इस्टेट वादांमध्ये 'मसल पॉवर' म्हणून वापर