Rohit Sharma Mumbai Shivaji Park Video : टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या सतत चर्चेत आहे. बीसीसीआयने नुकतेच त्याच्याकडून भारतीय वनडे संघाचं नेतृत्व काढून घेतलं गेलं असून, त्याच्या जागी शुभमन गिलला (ODI captaincy to Shubman Gill) ही जबाबदारी देण्यात आली आहे. तरीदेखील रोहितला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी (India tour of Australia) वनडे संघात स्थान मिळालं आहे. यासोबतच, तो आणि विराट कोहली (Virat Kohli) वर्ल्ड कप 2025 मध्ये खेळणार की नाही? यावर संभ्रमाचं वातावरणही कायम आहे. पण या सगळ्या चर्चांपासून दूर राहून ‘हिटमॅन’ आपली तयारी जोरात सुरू करत आहे.

Continues below advertisement

सध्या रोहित शर्मा मुंबईतच सराव करत असून, फिटनेस आणि बॅटिंग दोन्हीवर तितकाच भर देतोय. 10 ऑक्टोबर रोजी तो शिवाजी पार्कच्या मैदानात नेट्स सरावासाठी पोहोचला होता. मैदानावर त्याच्या बॅटिंगची झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती. रोहितच्या प्रत्येक शॉटवर मैदानात टाळ्यांचा कडकडाट होत होता, फॅन्सना आपल्या लाडक्या खेळाडूला समोर बॅटिंग करताना पाहून अक्षरशः समाधान मिळालं.

चाहत्यांच्या गर्दीत अडकला रोहित; अभिषेक ढाल बनून उभा राहिला

Continues below advertisement

पण जिथे चाहत्यांसाठी हा क्षण आनंदाचा होता, तिथेच रोहितसाठी थोडासा त्रासदायक ठरला. सराव संपल्यावर जेव्हा तो मैदानाबाहेर पडू लागला, तेव्हा गेटबाहेर त्याला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. प्रत्येक जण त्याचा फोटो, व्हिडिओ, ऑटोग्राफ घेण्यासाठी आतुर झाला होता. त्यामुळे रोहित काही काळ मैदानातून बाहेर पडूच शकला नाही. अखेर त्याच्या सोबत असलेला जिवलग मित्र आणि माजी क्रिकेटपटू अभिषेक नायर याने पुढाकार घेत गर्दी शांत करण्याचा प्रयत्न केला. नायर चाहत्यांना वारंवार विनंती करत होता की रोहितला जाण्यासाठी जागा द्या, त्याला लागलं नाही पाहिजे..., शेवटी परिस्थिती नियंत्रणात आली आणि रोहित सुरक्षितपणे मैदानाबाहेर पडू शकला.

दमदार बॅटिंग आणि जबरदस्त फिटनेस 

रोहितच्या तयारीबाबत बोलायचं झालं तर, तो नेट्समध्ये अप्रतिम लयीत दिसत होता. त्याची टायमिंग, फुटवर्क आणि मोठे शॉट्स पाहून सगळेच थक्क झाले. सरावादरम्यान त्याने एक शॉट इतका जोरात मारला की चेंडू सरळ जाऊन मैदानाबाहेर उभ्या असलेल्या त्याच्याच कारच्या काचेवर आदळला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल आहे.

फिटनेसच्या बाबतीतही ‘हिटमॅन’नं जबरदस्त रूपांतरण केलं आहे. गेल्या काही महिन्यांत त्याने 8 ते 10 किलो वजन कमी केलं असून, त्याचे फिटनेस व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. अभिषेक नायरनंही अलीकडच्या एका मुलाखतीत हेच उघड केलं की, “रोहित सध्या आपल्या फिटनेसवर प्रचंड लक्ष देतोय."

हे ही वाचा -

Mumbai squad for Ranji Trophy 2025 : मुंबई संघाची घोषणा! सूर्यकुमार यादव बाहेर, स्टार ऑलराउंडर झाला कर्णधार; सरफराज, शिवम दुबेसह 'या' 16 शिलेदारांना संधी