Solapur Crime News Update : घाम गाळून पिकवलेल्या ज्वारीच्या पेंड्या शेतातून चोरून (Solapur Barshi Crime) नेल्याचा प्रकार सोलापुरात उघडकीस आला आहे. बार्शी तालुक्यातील (barshi News) ताडसौंदणे गावात हा प्रकार घडला. या संदर्भात बार्शी तालुका पोलीस ठाण्यात (Barshi Police) गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. दत्तात्रय पाटील या शेतकऱ्याने या संदर्भात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा (Fir) नोंद करण्यात आला आहे. 


राज्यात अनेक ठिकाणी उन्हाची तीव्रता हळहळू वाढताना दिसतेय. त्यामुळे सोलापुरात देखील आतापासून पाण्याची कमरतात भासू लागली आहे. उजनी धरणाने तळ गाठलाय तर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ही पुढे येऊ लागला आहे. परिस्थिती हीच राहिली तर उन्हाळ्यात सोलापूरकराना दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. यंदाच्या वर्षी मुबलक प्रमाणात पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेकांची पिके शेतात जळून गेली. अशा ही परिस्थितीला तोंड देऊन शेतकऱ्यांनी पीक घेतलं. बार्शीतल्या ताडसौंदणे येथील रहिवासी दत्तात्रय पाटील हे देखील त्यातलेच एक आहेत. पावणे सहा एकर शेतीत दत्तात्रय पाटील यांनी ज्वारीचे पीक घेतले. दुष्काळी परिस्थितीमध्ये घाम गाळून पिकवलेल्या या ज्वारीचा घास घशात घालायच्या वेळेस अज्ञात चोरट्यानी हिरावून नेला.


दत्तात्रय पाटील यांनी 4 फेब्रुवारी रोजी शेतात पिकवलेली ज्वारी काढली. रात्री 09.00 वा. चे सुमारास ज्वारीची कणसे असलेला कडबा काढून बांधून ठेवला. दुसऱ्या दिवशी सकाळी शेतातील रात्री काढलेल्या ज्वारीच्या कडब्याच्या पेंड्या बांधण्यासाठी जेव्हा दत्तात्रय पाटील गेले तेव्हा ज्वारीच्या कडब्याच्या पेंड्या दिसून आल्या नाहीत.  काढलेल्या एकूण कडब्याच्या पेंड्या पैकी 23 ह्या चोरीला गेल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. पाटील यांनी आजूबाजूच्या परीसरात ज्वारीच्या कडब्याच्या पेंड्याचा शोध घेतला परंतू त्या मिळून आल्या नाहीत, म्हणून कोणीतरी अज्ञात चोरटयाने शेतातील ज्वारीची कणसे असलेल्या कडब्याच्या काढून बांधून मोजून ठेवलेल्या 23 पेंड्या चोरुन नेल्या असल्याबाबत दत्तात्रय पाटील यांनी फिर्याद दिलीय..


या आधी देखील कणसं आणि कडबा पेंडी चोरीला गेल्या होत्या. मात्र मी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर पुन्हा हा प्रकार घडला आहे. आता जवळपास 23 पेंड्या ज्वारी असलेली कणसे चोरीला गेली आहेत. यातून किमान 25 ते 30 किलो ज्वारी आली असती. शिवाय जनावरासाठी चारा ही झाला असता. मात्र चोरट्यानी हे पळवले. त्यामुळे मी पोलिसात जाऊन तक्रार दिली आहे, अशी प्रतिक्रिया  दत्तात्रय पाटील यांनी एबीपी माझाला दिली.