Solapur Crime News : सोलापूर शहरातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. सोलापुरातील जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल (Solapur Suicide News) उचल आत्महत्या (Suicide)केलीय. प्रकाश बाविस्कर असे आत्महत्या केलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे नाव आहे. दरम्यान जोपर्यंत दोषी (Solapur Crime) अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा आता बाविस्कर कुटुंबीयांनी घेतलाय. या घटनेने परिसरासह शहरात खळबळ उडाली असून या प्रकरणी आता नेमकी काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Continues below advertisement

Solapur Crime News : कुटुंबीयांकडून गंभीर आरोप; मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

दरम्यान, उपमुख्य अधिकाऱ्यांच्या नावाने कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मानसिक त्रास देत आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा कुटुंबीयांकडून आरोप करण्यात आलाय. बाविस्कर यांना दप्तर तपासणीच्या नावाखाली लाच मागत धमकावल्याचा देखील कुटुंबीयांनी आरोप केला. तर याच त्रासाला कंटाळून 19 नोव्हेंबर रोजी प्रकाश बाविस्कर यांनी राहत्या घरी गळफास घेत जीवनयात्रा संपवलीय. मात्र उपचारादरम्यान काल बार्शीतील खासगी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान जोपर्यंत दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास बाविस्कर कुटुंबीयांनी नकार दिलाय. त्यामुळे पोलीस याप्रकरणी नेमकी काय कारवाई करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. बाविस्कर यांचा मृतदेह प्रशासनाने परस्पर शवविच्छेदनासाठी पाठवल्याचाही कुटुंबीयांचा आरोप आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Continues below advertisement