Solapur Crime News: माढा तालुक्यात नातेसंबंधांना काळिमा फासणारी अत्यंत धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या वडिलानेच आपल्या मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करून तिला गरोदर केल्याची संतापजनक बाब समोर आली असून या घटनेमुळे तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी नराधम वडिलाविरुद्ध बलात्कारासह पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत आणि इतर सात गंभीर कलमान्वये माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. 

Continues below advertisement

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, माढा तालुक्यातील एका गावात आरोपी वडील गेल्या काही काळापासून आपल्या मुलीवर वारंवार शारीरिक अत्याचार करत असल्याचे समोर आले आहे. भीती आणि दबावामुळे पीडित मुलगी बराच काळ शांत राहिली. मात्र काही दिवसांपूर्वी तिची प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Solapur Crime News: नराधम बापाला पोलिसांकडून अटक 

रुग्णालयात तपासणीदरम्यान डॉक्टरांना तिच्या प्रकृतीबाबत संशय आला. त्यानंतर डॉक्टरांनी मुलीशी सविस्तर संवाद साधला असता तिने आपल्या जन्मदात्या वडिलांकडूनच वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती दिली. या माहितीमुळे रुग्णालय प्रशासनाने तातडीने पोलिसांना कळवले. घटनेची माहिती मिळताच माढा पोलिसांनी रुग्णालयात जाऊन पीडित मुलीचा जबाब नोंदवला. मुलीने दिलेल्या जबाबावरून नराधम वडिलाविरुद्ध बलात्कारासह पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत आणि इतर सात गंभीर कलमान्वये माढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Continues below advertisement

Solapur Crime News: सोलापुरात वृद्ध दाम्पत्याचा गळा दाबून खून 

दरम्यान, सोलापुरातील स्वागत नगर परिसरात एका वृद्ध दाम्पत्याची गळा दाबून हत्या झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महादेव मंचाळ आणि रंगम्मा महादेव मंचाळ अशी मृत दाम्पत्याची नावे आहेत. महादेव मंचाळ हे बीएसएनएलमधून सेवानिवृत्त झालेले होते. मंचाळ यांच्या घराचे काही महिन्यांपासून बांधकाम सुरू असल्याने ते शेजारील एका कच्च्या घरात राहत होते. दरम्यान, काल दुपारच्या सुमारास बांधकामासाठी आलेले मजूर पिण्याचे पाणी मागण्यासाठी त्या घरात गेले असता दोघेही मृतावस्थेत आढळून आले. ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ परिसरातील नागरिकांना आणि पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक तपासात दोघांचाही मृत्यू गळा दाबल्याने झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

आणखी वाचा

Chhatrapati sambhajinagar crime: गुप्तधनाच्या नावाने खणलेल्या खड्ड्यात प्राध्यापकाला पुरलं, 'क्राइम पेट्रोल'च्या स्टोरीलाही लाजवेल असा प्लॅन रचला पण अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडलेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये नक्की काय घडलं?