Mumbai News : शिवसेना ठाकरे गटाच्या (Shiv Sena Thackeray Group) पदाधिकाऱ्याला कुख्यांत गुंड छोटा राजनचा (Chhota Rajan) फोन आल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला कुख्यात गुंड खुद्द छोटा राजनने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याची चर्चा रंगली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला कुख्यात गुंड छोटा राजनने फोन केला आणि फोनवरून वाढदिवसाच्या शुभेच्या दिल्याचं बोललं जात आहे. अंडरवर्ल्ड डॉन राजन निकाळजे उर्फ कुख्यात गुंड छोटा राजनचा फोन आल्यामुळे राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांना उधाण आलं आहे. 


ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला छोटा राजनचा फोन?


कुख्तात गुंड छोटा राजनचा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला फोन आल्याची बातमी सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला छोटा राजनचा फोन आल्याची माहिती समोर आली आहे. पदाधिकाऱ्याला फोन करून छोटा राजनने शुभेच्छा दिल्या असं बोललं जात आहे. कुख्यात गुंडांचे ठाकरे गटाच्या संबंध आहे का असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर कुख्तात गुंडांशी संबंध असल्याचं सांगून बदनाम करण्याचा डाव असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्याने केला आहे. शिवसेना नेते विलास रुपवते यांना छोटा राजनने फोन केला आणि फोनवर त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याचं सांगितलं जात आहे. सर्वत्र याची चर्चा रंगली आहे.


नेमकं प्रकरण काय?


घाटकोपर पूर्वचे शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी विलास रुपवते (Vilas Rupawate) यांचा 16 मार्चला वाढदिवस होता. या दिवशी त्यांच्या फोनवर एक फोन आला आणि भाई बोलेंगे म्हणून एक व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या हातात फोन दिला, फोनवर बोलणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीने आपण छोटा राजन बोलत आहोत, असं सांगितलं आणि विलास रुपवते यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र, कदाचित हा विरोधकांचा बदनाम करण्याच्या डाव असू शकतो म्हणून विलास रुपवते यांनी याबाबत पंतनगर पोलीस ठाण्यात पत्र देऊन तक्रार दिली आहे. या अनुषंगाने आता पंतनगर पोलीस तपास करीत आहे.


छोटा राजनला दोन वर्षांची शिक्षा


अंडरवर्ल्ड डॉन राजन निकाळजे उर्फ छोटा राजनला खंडणीच्या एका प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी त्याला दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. व्यावसायिकाकडून 26 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी न्यायालयाने छोटा राजनला दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच, छोटा राजनवरील देशभरातील सर्व गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला आहे.