Satara Crime : महाविद्यालयीन तरुणीसोबत अश्लील चाळे, कोल्हापूर पोलीस दलातील कर्मचाऱ्याला अटक

Satara Crime : सातारा ते कराड असा प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीची बसमध्ये छेड काढच्या आरोपाखाली कोल्हापूर पोलीस दलातील कर्मचाऱ्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Continues below advertisement

Satara Crime : सातारा (Satara) जिल्ह्यात सोमवारी (17 ऑक्टोबर) एक खळबळजनक घटना घडली. सातारा ते कराड असा प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीची बसमध्ये छेड काढच्या आरोपाखाली कोल्हापूर पोलीस (Kolhapur Police) दलातील कर्मचाऱ्यावर पॉक्सो (POCSO) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेश मगदूम असं गुन्हा दाखल केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. 

Continues below advertisement

सातारा ते कराड असा एसटीने प्रवास करणाऱ्या महाविद्यालयीन युवतीच्या शेजारी बसलेल्या महेश मगदूम या पोलीस कर्मचाऱ्याने तिच्यासोबत अश्लील चाळे केले. दरम्यान याबाबत संबंधित युवतीने याबाबतची माहिती फोनवरुन तिच्या आई-वडिलांना आणि तिच्या मित्र मैत्रिणींना दिली. कराड एसटी स्टॅण्डवर बस पोहोचेपर्यंत तिचे मित्र पोलिसांना सोबत घेऊनच तिथे हजर झाले आणि छेड काढणाऱ्याला ताब्यात घेतले. 

संबंधित कर्मचारी हा कोल्हापूर पोलीस दलात कार्यरत आहे. कोल्हापूर पोलीस खात्यात तो खेळाडू आहे. सातारा शहरात सुरु असलेल्या पोलिसांच्या स्पर्धेसाठी तो आला होता. या घटनेतील महाविद्यालयीन युवतीने कराड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर संशयित आरोपी महेश मगदूम याच्यावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही घटना बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने हा गुन्हा बोरगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून आणि ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपी महेश मगदूम यालाही बोरगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे.

मुख्यमंत्र्याच्या ठाण्यात रिक्षाचालकाकडून शाळकरी मुलीचा विनयभंग
काही दिवसांपूर्वी ठाण्यात रिक्षाचालकाकडून मुलीचा विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. ठाण्याच्या स्टेशन रोड परिसरात एक रिक्षावाला एका शाळकरी मुलीला फरफटत नेत असल्याचा एक सीसीटीव्ही व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. या घटनेत शाळकरी मुलगी जखमी झाली आहे. त्या मुलीला फरफटत नेण्यामागे त्या रिक्षावाल्याचा नेमका काय हेतू होता? याचा पोलीस तपास करत आहेत. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली केल्यानंतर पोलिसांनी रिक्षाचालकाचा शोध घेतला आणि अवघ्या 24 तासांच्या आतमध्ये आरोपी रिक्षाचालकाला अटक करण्यात आली. परंतु या धक्कादायक घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यातच महिला असुरक्षित असल्याचं चित्र यामुळे समोर येत आहे. 

संबंधित बातमी

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola