मुंबई : शिवसेना नेते संजय निरुपम यांनी बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात माध्यमांमध्ये काही खोट्या गोष्टी पसरवल्या जात आहेत, असं म्हटलं. संजय निरुपम यांनी मीडियामध्ये तीन गोष्टी पसरवल्या जात असल्याचं म्हटलं. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात पोलिसांना निष्पक्षपणे तपास करु द्या, असं संजय निरुपम म्हणाले.  


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर दसऱ्याच्या दिवशी रात्री गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये बाबा सिद्दिकी यांचा जागीच मृत्यू झाला होता. पोलिसांनी घटनास्थळावर दोन आरोपींना अटक केलं होतं. धर्मकुमार कश्यप आणि गुरमैल सिंग यांना पोलिसांनी अटक केलं होतं. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील तिसरा आरोपी शिवकुमार गौतम फरार आहे. कश्यप आणि गुरमैल सिंग या दोघांच्या अटकेनंतर बिश्नोई अँगल असल्याचं समोर आलं होतं.


संजय निरुपम म्हणाले की बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मीडियात काही गोष्टी पसरवल्या जात आहेत. यापैकी काही गोष्टी संजय निरुपम यांनी सांगितल्या आहेत. ते म्हणाले की पहिली खोटी गोष्ट ही आहे की त्यांना 15 दिवसांपूर्वी बिष्णोई गँगकडून धमकी मिळाली होती. हे धडधडीत खोटं आहे.  


बाबा सिद्दिकी यांच्याकडून पोलिसांना पत्र लिहून सुरक्षा मागण्यासाठी पत्र लिहिलं असल्याचा दावा केला जातोय, ही आणखी एक खोटी गोष्ट असल्याचं निरुपम म्हणाले. बाबा सिद्दिकी यांनी सुरक्षेसाठी कसलंही पत्र लिहिलं नव्हतं. 


बाबा सिद्दिकी यांना वाय प्लस सुरक्षा दिली गेली होती हे देखील खोटं असल्याचं संजय निरुपम म्हणाले. बाबा सिद्दिकी यांच्यासोबत केवळ एक बंदूकधारी पोलीस होता. कृपया खोट्या गोष्टींपासून दूर राहा, पोलिसांना योग्य तपास करु द्या, असं संजय निरुपम म्हणाले. 




पोलिसांकडून आतापर्यंत तीन जणांना अटक


बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे. तर, तीन आरोपी फरार आहेत. धर्मराज कश्यप, गुरमैल सिंग यांना अटक करण्यात आली आहे. प्रवीण लोणकर याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. बाबा सिद्दिकींचे मारेकरी काही दिवसांपूर्वी पुण्यात वास्तव्यास होते, तेव्हा मारेकऱ्यांना प्रवीण लोणकर यानं काम मिळवून दिलं होतं. शिवकुमार गौतम, शुभम लोणकर आणि मोहम्मद झीशान अख्तर हे तिघे फरार आहेत.  मुंबई पोलिसांच्या टीमकडून या प्रकरणी तपास करण्यात येत आहे. 


इतर बातम्या : 


बाबा सिद्दीकींच्या हत्येचा वेगळा अँगल समोर; लॉरेन्स बिश्नोईची दुश्मनी नव्हे तर कोट्यवधींच्या SRA प्रकल्पाचा विरोध नडला