सांगली : सांगलीतील शिराळा तालुक्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. 35 वर्षीय महिलेवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली आहे. एवढचं नाहीतर हत्येनंतर मारेकऱ्यानं महिलेचा मृतदेह विहिरीत फेकून दिला. ही हत्या गावातीलच 22 वर्षीय तरुणानं केल्याची माहिती मिळत आहे. हा तरुण गावातील महिलांची सतत छेड काढत होता. त्यामुळे आरोपीविरोधात गावकऱ्यांच्या मनात असंतोष असल्याचं पाहायला मिळत आहे. या गुन्ह्यातील आरोपीला लवकरात लवकर अटक करुन त्याला फाशीचा शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी स्थानिकांनी कँडल मार्च काढला होता. शिराळा तालुक्यात या घटनेनं खळबळ निर्माण झाली आहे.


शिराळा तालुक्यातील देववाडी गावात ही घटना घडली आहे. गुरुवारी रात्री हा धक्कादायक प्रकार समोर आला. एका 35 वर्षीय महिलेवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर तिचा मृतदेह विहिरित टाकून आरोपीनं तिथून पळ काढल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. याप्रकरणी गावातीलच एका 22 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली होती. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून हा तरुण गावातील महिलांची छेड काढत होता, असाही आरोप गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात आला आहे.


पाहा व्हिडीओ : 35 वर्षीय महिलेवर अत्याचार करुन हत्या; गावकऱ्यांचा कँडल मार्च, आरोपीला फाशी देण्याची मागणी



35 वर्षीय महिला शेतात गेली असताना तिथे तिला गाठून आरोपी तरुणानं तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिची हत्या करुन तिचा मृतदेह विहिरित फेकून दिला, असा आरोप गावकऱ्यांच्या वतीनं केला जात आहे. या तरुणाच्या विरोधात गावातील लोकांच्या मनात प्रचंड असंतोष आहे. घटना समोर आल्यानंतर पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली. त्यानंतर शनिवारी गावकऱ्यांच्या वतीनं कँडल मार्च काढण्यात आला. तसेच, या आरोपीला त्याचा फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणीही गावकऱ्यांच्या वतीनं करण्यात आली.


महत्त्वाच्या इतर बातम्या :