रत्नागिरी : शहरात माणुसकीला काळिमा फासणारी संतापजनक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी दोघा तरुणांना अटक केली आहे. या किळसवाण्या प्रकारामुळं परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Continues below advertisement

Ratnagiri Crime News: राजिवडा परिसरात घडली घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना 22 फेब्रुवारी रोजी रत्नागिरी शहरातील राजिवडा परिसरात घडली. या प्रकरणात जुबेर सलीम शेख (वय 22) आणि मुस्तकीन गडकरी (वय 24) यांनी एका अल्पवयीन बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलगा घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळं त्यानं सुरुवातीला हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला नव्हता.

Viral Video Case: व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उघडकीस

दरम्यान आरोपींनी या कृत्याचा व्हिडीओ तयार करून तो सोशल मीडियावर प्रसारित केला. 12 मार्च रोजी पीडित मुलाच्या वडिलांच्या निदर्शनास सोशल मीडियावर हा व्हिडीओ आला. व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला, कारण त्यामध्ये दिसणारा मुलगा त्यांचा स्वतःचा मुलगा असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. यानंतर त्यांनी तात्काळ रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

Continues below advertisement

POCSO Case : पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांसह POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. तसंच कृत्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केल्यामुळं माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसारही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या कायद्यातील तरतुदींनुसार, अल्पवयीन मुलांवरील अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये कडक शिक्षेची तरतूद आहे. 

Police Investigation: दोन्ही आरोपी अटकेत

या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी स्वतः तपास हाती घेतला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून हा व्हिडीओ आणखी कुठे प्रसारित करण्यात आला आहे का, याचा तांत्रिक तपास सध्या सुरू आहे.

ही बातमी वाचा: