Pune Crime News: मांजर (Cat) आणि पोपट (Parrot) यांचा वाद आपण अनेक गोष्टींमध्ये ऐकतो. मात्र अशीच एक घटना पुण्यात (Pune News) प्रत्यक्षात घडली असून या वादाची नोंद थेट पोलीस (Police) ठाण्यापर्यंत पोहोचली आहे. शहरातील ताडीवाला रोड परिसरात मांजर आणि पोपटाच्या कारणावरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला आणि त्याचे रूपांतर तुफान मारामारीत झाले. या प्रकरणी मांजरीचा मालक दिनेश रंगराव पोताबत्तोनी याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Continues below advertisement

Pune Crime News: मांजरीमुळे वारंवार निर्माण होत होता वाद

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिषेक सिंग हे ताडीवाला रोड परिसरात कुटुंबासह राहतात. त्यांनी आपल्या घरात एक पोपट पाळला असून त्याचा पिंजरा घरासमोर ठेवलेला असतो. त्यांच्या शेजारी राहणारे दिनेश रंगराव पोताबत्तोनी यांनी मांजर पाळले आहे.

हे मांजर परिसरात मोकळेपणाने फिरत असल्याने ते अनेकदा सिंग यांच्या घरासमोर येऊन पोपटाच्या पिंजऱ्याजवळ फिरत असे. काही वेळा त्या मांजरीने पोपटाचा पिंजरा ढकलल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे सिंग यांना याचा त्रास होत होता. त्यांनी याबाबत शेजारी दिनेश पोताबत्तोनी यांना मांजरीवर लक्ष ठेवण्याची विनंती केली होती. मात्र याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत होता.

Continues below advertisement

Pune Crime News: पिंजरा पाडल्यानंतर वाद चिघळला

घटनेच्या दिवशीही मांजरीने पुन्हा एकदा पोपटाचा पिंजरा पाडल्याने दोघांमध्ये वाद झाला. पिंजरा पडल्यामुळे संतापलेल्या अभिषेक सिंग यांनी दिनेश पोताबत्तोनी यांना मांजरीवर नियंत्रण ठेवण्यास सांगितले. मात्र ही बाब दिनेश यांना न पटल्याने दोघांमध्ये जोरदार वाद सुरू झाला.

Pune Crime News: दोन कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी

सुरुवातीला दोघांमध्ये तोंडी वाद झाला. त्यानंतर दोन्ही कुटुंबातील सदस्यही या वादात सहभागी झाले. पाहता पाहता परिस्थिती चिघळली आणि दोन्ही बाजूंचे लोक रस्त्यावर येऊन एकमेकांना शिवीगाळ करू लागले. काही वेळातच या वादाचे रूपांतर धक्काबुक्की आणि मारहाणीत झाले. या मारहाणीत अभिषेक सिंग यांना दुखापत झाली.

Pune Crime News: पोलिसांत गुन्हा दाखल

या घटनेनंतर अभिषेक सिंग यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत दिनेश रंगराव पोताबत्तोनी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. मांजर आणि पोपटाच्या कारणावरून शेजाऱ्यांमध्ये एवढा मोठा वाद होऊन मारामारी झाल्याची चर्चा सध्या परिसरात रंगली आहे. पुणे शहरात क्षुल्लक कारणांवरून वाद वाढून मारहाण आणि गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता नागरिकांमध्ये व्यक्त केली जात आहे.

आणखी वाचा 

Pune Police: वेलकम सीपी सर!!! रेड कार्पेट, पोलीस बॅंड... पुण्याच्या पोलीस आयुक्तांची तऱ्हाच न्यारी; गुन्हेगारीच्या आढाव्यापेक्षा स्वागताचीच चर्चा!