Raj Kundra Case :  अश्लील चित्रफित बनवणे आणि वितरित करण्याप्रकरणी सध्या राज कुंद्रा पोलीस कोठडीत आहे. पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेतच. पण याचा सखोल तपास सध्या सुरू आहे. त्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. त्यापैकीच एक, राज कुंद्रा ज्या साईटसाठी हे काम करत असे, त्या हॉटशॉट या साईटसाठी अश्लील व्हिडिओ बनवण्यासाठी अर्थपुरवठा करत असे, ती साईट अर्धनग्न वावरायची तयारी असेल तरच त्या कलाकारांना या प्रोजेक्टमध्ये काम करायला देत असे.  एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार पारस रंधवा आणि ज्योती ठाकूर यांच्याकडून अशा प्रकारच्या छायाचित्रांची मागणी करणारा ईमेल लीक झाला आहे. 


 Raj Kundra : 'डर्टी पिक्चर'चा तुरुंगात 'दी एन्ड'? अशी झाली राज कुंद्राच्या पॉर्न रॅकेटची पोल-खोल


हा ई मेल 14 ऑगस्ट 2020 चा आहे. यात हॉटशॉटच्या सीईओने पारस रंधवा आणि ज्योती ठाकूर यांना हा ई मेल केलेला आहे. यात या कंपनीच्या आगामी ख्वाब या प्रोजेक्टसाठी या कलाकारांची छायाचित्रे मागवण्यात आली. या ई मेलमध्ये नमूद केल्याप्रमाणे ही छायाचित्रे  अर्धनग्न (टॉपलेस) असणे अनिवार्य होतं. शिवाय या प्रोजेक्टमध्ये कॅमेरा कोणत्या एंगलने वापरला जाणार आहे, यात कलाकारांनी कसं टॉपलेस वावरायचं आहे, शिवाय पाठमोरा भाग कसा चित्रित केला जाणार आहे, याची पूर्ण माहीती यात दिली गेली आहे.


Raj Kundra Case : पॉर्न फिल्म रॅकेटचं सावज ठरलेली मॉडेल 'माझा'वर, म्हणते... 


या ई मेलच्या सुरुवातीला संपूर्ण तांत्रिक माहीती देण्यात आली आहे. हा व्हिडिओ एमपी4 फॉरमॅटमध्ये असणार आहे. याच्या प्रमोशनसाठी कलाकारांचे बोल्ड फोटोज लागणार आहेत. त्याची काही पोस्टर्स बनवली जाणार आहेत. काही पोस्टर्स रेग्युलरही असतील. सोशल मीडियावर ती कशी सर्क्युलेट केली जाणार आहेत, याची माहीतीही इथे देण्यात आली आहे. 


या ईमेलच्या शेवटी हॉटशॉटने अनेक गोष्टीचा निर्वाळा दिला आहे. पारस आणि ज्योतीने केलेले अर्धनग्न व्हिडिओज जर कंपनीच्या टीमला आवडले, तर त्यांना प्रत्येकी 3 लाख रुपये दिले जातील. त्यानंतर त्यांच्यावर चित्रित होणारा सगळा कंटेंट हॉटशॉटच्या मालकिचा असेल. जर या दोघींचे व्हिडिओ टीमला आवडले नाहीत तर मात्र त्या दोघीही हे व्हिडिओ कुणालाही देऊ शकतात, कोणत्याही किमतीला. 


या ईमेलमध्ये कलाकारांना कशापद्धतीने शूट करावं लागणार आहे याचीही पूर्ण माहिती देण्यात आली आहे. या ई मेलमध्ये नमूद केल्याप्रमाणे कलाकारांना आपलं संपूर्ण प्रोफाईल कंपनीला पाठवावं लागणार आहे. यात एकदा निवड झाल्यानंतर कलाकाराला पुढून टॉपलेस शूट करावं लागेल, तर मागून पूर्ण नग्न पोज द्यायची तयारी ठेवावी लागणार आहे. 


पोलीसांच्या हाती लागलेल्या या ईमेलमुळे हॉटशॉट कंपनी बनवत असलेल्या ख्वाब या प्रोजेक्टवर कसं काम चालू होतं याची कल्पना आली आहे. हॉटशॉट ही राज कुंद्रा यांची भागीदारी असलेली कंपनी होती. ईमेलमध्ये नमूद केलेल्या गोष्टीं केवळ चित्रिकरणावेळी कटाक्षाने पाळल्या जात वा आणखी काही सूचना चित्रिकरण स्थळी कलाकारांना केल्या जात होत्या, याचा तपास यंत्रणा करत असल्याचं कळतं.