पुणे : स्वारगेट बस स्टँड बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडेला पकडण्यासाठी शिरुरच्या गुनाट गावात पोलिसांचा ताफा पोहोचला आहे. सुमारे 100 पोलिस आणि पोलिस स्कॉड दत्ता गाडेच्या मागावर असून तो ज्या ठिकाणी लपून बसला आहे त्या ठिकाणाला पोलिसांनी घेराव घातला आहे. दत्ता गाडे ज्या शेतामध्ये लपून बसला असल्याची माहिती आहे त्या ठिकाणी पोलिसांनी मोठा फौजफाटा तैनात केला आहे. या भागात पोलिसांकडून ड्रोनचीही मदत घेतली जात आहे. 

Continues below advertisement

दत्ता गाडे हा ज्या शेतात लपून बसल्याची माहिती आहे त्या ठिकाणी पोलिसांचे डॉग स्कॉड पोहोचलं आहे. दत्ता गाडे याने बुधवारी ज्या घरामध्ये पाण्याची मागणी केली होती त्या ठिकाणीही चौकशी करण्यात आली आहे. पाण्याअभावी आरोपी जास्त वेळ राहू शकणार नाही असा पोलिसांचा अंदाज आहे. 

पाण्याच्या लोकेशनवर पोलिसांचा बंदोबस्त

आरोपी ज्या ठिकाणी लपून बसला आहे त्या ठिकाणी त्याला पाण्याचा पुरवठा होऊ नये याची खबरदारी पोलिसांनी घेतली आहे. या शेतात ज्या ठिकाणाहून पाणी पुरवठा केला जातो त्या लोकेशनवर पोलिसांचा बंदोबस्त आहे. त्यामुळे आरोपी जर पाणी प्यायला आला तर पोलिसांना त्याला पकडता येईल. 

Continues below advertisement

बलात्कार करून कीर्तनाच्या कार्यक्रमात

आरोपी दत्तात्रय गाडे याने मंगळवारी पहाटे तरुणीवर बलात्कार केला. त्यानंतर तो शिरुर तालुक्यातील गुनाट या त्याच्या गावी गेला. गावातील कीर्तनाच्या कार्यक्रमात देखील तो सहभागी झाला. त्यानंतर बुधवारी सकाळपर्यंत तो गावातच होता. मात्र दुपारी माध्यमांमधून त्याचे फोटो आणि नावासह बातम्या सुरु झाल्या तेव्हा तो गायब झाला. 

दत्ता गाडेचे राजकीय कनेक्शन?

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील फरार आरोपी दत्तात्रय गाडेचं राजकीय कनेक्शन असल्याची चर्चा सुरू झालीय.. आणि ही चर्चा सुरू होण्याचं कारण म्हणजे, अजित पवारांच्या आमदाराच्या फ्लेक्सवर झळकलेला गाडेचा फोटो. शिरुरचे माजी आमदार अशोक पवार यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेल्या फ्लेक्सवर, दत्ता गाडेचा फोटो झळकलाय.शिवाय शिरुर हवेली विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आमदार माऊली कटकेंसोबत आणि त्यांच्या फ्लेक्सवरही आरोपीचे फोटो झळकले. त्यामुळे नराधम गाडे हा आमदार माऊली कटकेंचा कार्यकर्ता असल्याचा आरोप होतोय. याबाबत स्वत: आमदार कटकेंनी स्पष्टीकरण दिलं. 

ही बातमी वाचा: