बारामती : अज्ञात दरोडेखोरांनी पुणे-सोलापूर महामार्गावर (Pune Solapur Highway) वाहन चालकाला लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुणे-सोलापूर महामार्गावर वाहन चालकाला मध्यरात्री अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश न आल्याने या दरोडेखोरांनी त्याचा पाठलाग करुन या वाहन चालकाच्या स्कॉर्पिओ गाडीवर फायरिंग (Firing) करत त्याला अडवून मारहण केली. तसेच त्याच्याकडून तीन कोटी 60 लाख 26 हजार रूपये किंमतीचा ऐवज लुबाडल्याचा धक्कादाक मध्य रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडला आहे. या संदर्भात गाडीचे ड्रायव्हर भावेशकुमार अमृत पटेल आणि पी विजय कंपनीने इंदापूर पोलीस ठाण्यात (Indapur Police Station) तक्रार दिली आहे.


पी विजय कंपनीची रोकड घेऊन विजय आणि भावेश हे मुंबईला निघाले होते. विजय आणि भावेश हे दोघेही ड्रायव्हर आहेत. भावेशकुमार पटेल आणि विजय सोलापूरहून मुंबईच्या दिशेनं निघाले होते. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मौजे वरकुटे पाटी गावचे हद्दीत सोलापुर पुणे रोडवर ((Pune Solapur Highway) स्पीड ब्रेकर जवळ आले. भावेशकुमार आणि विजय हे स्कॉपीओमधून प्रवास करीत होते. भावेश हे गाडी चालवत होते.


दरम्यान, चार अज्ञात चोरटे हातातील लोखंडी टॉमी दाखवून फिर्यादी यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. परंतु फिर्यादी पटेल हे गाडी तेथून भरधाव वेगात सोलापुर-पुणे रोडने पुण्याच्या बाजूकडे घेऊन निघाले. त्यानंतर मारूती सुझुकी कंपनीची फोर व्हिलर स्विफ्ट गाडी आणि टाटा कंपनीच्या गाडीने पटेल यांच्या गाडीचा पाठलाग सुरू केला. गाडी थांबवत नाही म्हणून पटेल यांच्या गाडीवर फायरिंग करून पटेल यांना रस्त्यामध्ये अडवून चार चोरट्यांनी भावेशकुमार पटेल आणि विजयभाई यांना हाताने मारहाण केली आणि दोन चोरटे गाडीमध्ये बसलेले होते.


मारहाण करणाऱ्या त्या चार चोरट्यांनी पटेल यांच्या स्कॉर्पिओ गाडीमधील रोख रक्कम तीन कोटी 60 लाख रूपये रोख रक्कम आणि भावेशकुमार पटेल यांच्या जवळील रोख रक्कम 14 हजार रूपये तसेच दोन व्हिओ कंपनीचे मोबाईल असा एकूण तीन कोटी 60 लाख 26 हजार रूपये किंमतीचा ऐवज घेऊन फरार झाले. पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथक रवाना केली आहेत. लवकर आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश येईल असं उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांनी सांगितले. 


महत्त्वाच्या बातम्या: