Mumbai Crime News : लैंगिक अत्याचारप्रकरणी (Sexual Assault ) मुंबईतील (Mumbai) एका पोलीस हवालदाराला (Police Constable) निलंबित ( Suspended ) करण्यात आले आहे. सचिन सणस (Sachin Sanas) असे या हवालदाराचे नाव असून तो मुंबई पोलिसांच्या स्थानिक शस्त्रास्त्र विभागात तैनात आहे. सचिन सणस या पोलीस हववालदारावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे त्याच्यवार निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे.  


पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन सणस हा वरळीचा रहिवासी आहे. तो मुंबई पोलिसांच्या स्थानिक शस्त्रास्त्र विभागात तैनात असून त्याने त्याच्याच परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा लैंगिक छळ केल्याचा आरोप आहे. त्यामुळे पीडित महिलेने वरळी पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्याला निलंबित करण्यात आले. 


पीडित महिला ही एका पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी आहे. ती सचिन सणस याच्या घराजवळ राहते. त्यामुळे दोघांची ओळख आहे. या ओळखीतून त्याने पीडितेवर लैंगिक अत्याचार केले असा आरोप पीडितेने केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 


पीडितेने आरोप केला आहे की, सणस तिच्यावर अश्लील टिप्पण्या करुन तो तिच्याकडे काही अश्लील हावभाव करत असे. 3 ते 6 ऑगस्ट दरम्यान तीन दिवस छळ झाल्याचा आरोप तिने केला असून त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर भारतीय दंड संहितेच्या कलम 354 (ए) (लैंगिक छळ) आणि 509 (शब्द, हावभाव किंवा कोणतेही कृत्य जे एखाद्या महिलेच्या शिष्टाचाराचा अपमान करण्याच्या हेतूने केले जाते) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.


दरम्यान, सचिन सणस याला अटक करण्यात आली आणि त्यानंतर जामीन मंजूर करण्यात आला. परंतु, मुंबई पोलीस विभागाने चौकशी सुरू केली असून सणस कोणत्याही पुराव्याला किंवा साक्षीदारास अडथळा आणू नये याची खात्री करण्यासाठी, त्याला पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे. निलंबीत करण्यात आलेल्या पोलीस हवालदारावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.  


महत्वाच्या बातम्या


Nagpur Crime : पत्नीने 40 हजारात दिली पतीला संपवण्याची सुपारी, महिलेसह चौघांना 29 पर्यंत कोठडी 


Wardha Crime : संतापजनक! 7 वर्षीय चिमुकलीवर आजोबांकडूनच अत्याचार, नराधम आरोपी अटकेत