Pune Hinjewadi Tempo fire : पुण्याच्या हिंजवाडी परिसरात एका टेम्पो ट्रॅव्हल्सला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. या आगीत एकूण चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी अंत झाला. या ट्रॅव्हल्समध्ये कंपनीचे कर्मचारी बसलेले होते. दरम्यान, याच आगीच्या घटनेतील धक्कादायक माहिती समोर येत आहे. ही आग काही तांत्रिक बिघाडामुळे लागलेली नव्हती. खु्द्द ड्रायव्हरनेच हा घातपात घडवून आणला होता. पोलिसांच्या तपासात ही माहिती उघड झाली आहे. 

टेम्पो ट्रॅव्हल्सला लागली होती आग

आगीची ही घटना 19 मार्च राजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली. ही घटना समोर येताच पोलिसांनी आपला तपास सुरू केला होता.  विशेष म्हणजे घटना घडल्यानंतर पुढच्याच काही तासांत पोलिसांनी या आगीच्या कारणाचा शोध लावला आहे. टेम्पो ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हरनेच ही आग लावल्याचे समोर आले आहे. हा घापतात घडवून आणण्यासाठी त्याने भल्याभल्यांना थक्क करणारी योजना आखली होती. 

पोलिसांनी नेमकी काय माहिती दिली? 

या प्रकरणाचा तपास केल्यानंतर पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत या घातापाताची संपूर्ण माहिती सांगितली. पोलिसांनी सांगितल्यानुसार हिंजवडी पोलीस ठाण्याने या घटनेचा उलगडा केला आहे. जळालेल्या गाडीच्या चालकाचे नाव जनार्दन हंबर्डीकर (वय 54 वर्षे) असे आहे. त्यानेच घातपात रचून हे कृत्य केले. त्याने कंपनीतून एक लिटर बेंझीन हे केमिकल आणले होते. हे केमिकल त्याने स्वत:च्या ड्रायव्हिंग सिटच्या खाली ठेवले होते. सोबतच कंपनीत वापरल्या जाणाऱ्या कापडाच्या चिंध्या त्याने ठेवल्या होत्या. त्यानंतर आगपेटीच्या मदतीने हा स्फोट घडवून आणण्यात आला. यात चार लोकांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. 

आरोपी सध्या मेडिकल कस्टडीत

या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आलेली आहे. आरोप सध्या जखमी आहे. त्याच्यावर मेडिकल कस्टडीत आहे. त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया चालू झालेली आहे. हिंजवडी पोलीस या प्रकरणाता तपास करत आहेत, असे पुणे पोलिसांनी सांगितले.  

हेही वाचा :

Hinjawadi Fire Accident News: जेवणाचे डबे, अर्धवट जळालेल्या चपला! हिंजवडीमध्ये होरपळून मृत्यू झालेल्या चौघांनी शेवटपर्यंत जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला पण...

Hinjawadi Fire Accident News: काळ्याकुट्ट लोखंडावर नखांचे ओरखडे! लॉक झालेला दरवाजा उघडण्याचा आटोकाट प्रयत्न, फोटो पाहून अंगावर येतील शहारे