Pune Crime news : दुबईहून स्पाईसजेट फ्लाईटने पुण्यात आलेल्या (Pune Crime news ) एका महिला प्रवाशाकडून 20 लाख रुपयांचे 423 ग्रॅम सोने सीमा शुल्क विभागाने (कस्टम) जप्त केले आहे. या महिलेने सोन्याची पेस्ट असलेल्या कॅप्सूल लपवून आणल्याचे आढळून आले. या प्रकरणी एका 41 वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक प्रवासी महिला स्पाईसजेट एसजी-52 या विमानाने दुबईहून पुणे विमानतळावर आली.
या महिलेने ग्रीन चॅनल ओलांडल्यानंतर कस्टम अधिकाऱ्यांना तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. तिने तिच्यासोबत काही वस्तू लपवून आणल्याचा संशय आला. कस्टम अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी केली. तिला ताब्यात घेऊन रुग्णालयात तिची एक्स-रे तपासणी करण्यात आली. तिच्या शरीरात 423 ग्रॅमच्या सोन्याची पेस्ट असलेल्या दोन पांढऱ्या कॅप्सूल आढळून आल्या. कस्टम विभागाकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
Pune Crime news : पळ काढण्याच्या तयारी होती मात्र...
ही महिला पुणे विमानताळावरुन गडबडीत बाहेर पडण्याच्या तयारीत होती. त्यावेळी पोलिसांना तिच्यावर संशय आला. त्यानंतर तिची चौकशी करण्याचं पोलिसांनी ठरवलं. मात्र तिने शक्कल लढवत लपवून आणलेलं सोनं पोलिसांच्या हाती लागणार नसल्याची काळजी घेतली. अखेर पोलिसांनी एक्स-रे तपासणी केली. या महिलेची शक्कल कामी आली नाही. अखेर पोलिसांनी या महिलेला जेरबंद केलं.
Pune Crime news : सीमा शुल्क विभागाची गुन्हेगारांवर करडी नजर
मागील काही दिवसांपासून सिमा शुल्क विभागाने धडाधड कारवाई करायला सुरुवात केली आहे. पुण्यात 5 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त केले होते. अंमली पदार्थ विरोधी आणि कस्टम विभागाची संयुक्त कारवाई करण्यात आली होती. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली होती. मेथॅम्फेटामाइन हे अंमली पदार्थ जलद आणि दीर्घकाळ टिकणारे प्रभाव असलेले कृत्रिम औषध, उत्तेजक म्हणून बेकायदेशीरपणे वापरले जाते. पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथक आणि कस्टम विभागाची संयुक्त कारवाई केली आहे. या सर्व प्रकरणी चार जणांना अटक केली होती. त्यानंतरदेखील अनेक ठिकाणावरुन ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :