Pune crime: पिंपरी चिंचवड मधील थेरगाव परिसरात घडलेल्या एका धक्कादायक हल्ल्याप्रकरणी गंभीर स्वरूपाचे आरोप असतानाही तिन्ही आरोपी जामीनावर बाहेर आले आहेत . डिलिव्हरी बॉय सोबत झालेल्या वादातून धारदार शस्त्राने हल्ला करत पीडित तरुणाच्या डाव्या हाताचा पंजा शरीरापासून वेगळा झाला . उजव्या हाताचा पंजा कापला गेला . इतकं सगळं घडूनही पोलिसांनी आरोपींना जामीन दिल्यामुळे संतप्त नातेवाईकांनी पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलनाचा पवित्रा घेतलाय . (Crime news )

Continues below advertisement

यानंतर वाकड पोलिसांना जाग आली असून तिन्ही आरोपींना अटक करण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात पुन्हा धाव घेतली गेली . त्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा ही पोलिसांनी सांगितलं आहे .मात्र आता ही परवानगी मिळेपर्यंत हे आरोपी पसार होणार नाहीत याची खबरदारी पोलीस घेतायत का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

नेमकं प्रकरण काय ?

पिंपरी-चिंचवडमधील थेरगाव परिसरात घडलेल्या एका गंभीर हल्ल्याप्रकरणी आरोपींना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. धारदार शस्त्राने हल्ला करून पीडिताचा डावा हाताचा पंजा पूर्णतः, तर उजवा पंजा अर्धा कापण्यात आला, तरीही आरोपी जामिनावर मोकळे झाल्याने संतप्त नातेवाईकांनी पोलीस आयुक्तालयासमोर आंदोलनाचा पवित्रा घेतलाय. रोहन निमज, शुभम पवार, आणि प्रशांत सकट अशी आरोपींची नावे आहेत. पीडित युवकाच्या घराजवळ राहणाऱ्या मुलीसोबत आरोपी रोहनने वारंवार गैरवर्तन केल्याची माहिती समोर आली आहे. हे वर्तन मुलीच्या मामाला कळताच, त्याने रोहनला जाब विचारला. त्याचा राग मनात धरून रोहनने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने पीडितावर हल्ला केला.

Continues below advertisement

डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या रोहनचे घराशेजारी असणाऱ्या मुलीवर एकतर्फी प्रेम असल्याचा संशय आहे.. ही बाब मुलीच्या मामाला समजली, त्यामुळं मामाने रोहनला हटकले. या रागातून रोहनने त्याचे मित्र शुभम आणि प्रशांतच्या मदतीने मुलीच्या मामाला संपवण्याचा कट रचला. त्यानुसार थेरगाव येथील लक्ष्मीबाई बारणे उद्यानशेजारी मामाला गाठले, दोन्ही मित्रांनी मामला पकडले अन रोहनने शस्त्राने डोक्याच्या दिशेने वार केला. मामाने वार चुकवला पण धारदार शस्त्राचा वार दोन्ही हाताच्या पंजावर झाला. यात डावा पंजा शरीरापासून वेगळा झाला तर उजवा पंजा अर्धा कापला गेला. याप्रकरणी वाकड पोलिसांनी रोहनसह दोन्ही मित्रांना बेड्या ठोकल्या. पण प्रकरण इतकं गंभीर असताना दुसऱ्याचं दिवशी तिन्ही आरोपींना जामीन कसा काय मिळाला? हा प्रश्न उपस्थित करत नातेवाईक संतप्त झाले. त्यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालायसमोर आंदोलन छेडलं. त्यानंतर वाकड पोलिसांना जाग आली. नातेवाईकांशी चर्चा करुन, नव्या कायद्यामुळं जामीन मिळाल्याचा दावा वाकड पोलिसांनी केलाय. मात्र या तिघांना पुन्हा एकदा अटक करण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयाकडे मागणी करणार असल्याचं वाकड पोलीस म्हणालेत. त्या दृष्टीने पावलं आता पोलिसांनी टाकायला सुरुवात केलीये. ती परवानगी मिळेपर्यंत हे तिन्ही आरोपी पसार होणात नाहीत, याची खबरदारी पोलीस घेणार का? याकडे ही सर्वांचं लक्ष लागून आहे.

हेही वाचा:

अंदाज समितीचा कार्यक्रम पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात; सदस्यांना थेट चांदीच्या थाळीतून जेवण, विरोधकांकडून सरकारवर सडकून टीका