Pune Kothrud Crime : पुणे शहरातून एक अतिशय खळबळजनक आणि तितकीच धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यातील (Pune Crime News) एका महिलेने पुरुषावर अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. या प्रकरणी कोथरूड (Kothrud Crime) पोलीस स्टेशनमध्ये महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुंगीच औषध देऊन कोल्हापूरच्या (Kolhapur) एका इसमावर हा अत्याचार करण्यात आल्याची माहिती आहे. तर या पीडित व्यक्तीसोबत काही अश्लील फोटो काढून त्याकडून पैशांची मागणी केली जात होती असेही सांगण्यात येतंय. गौरी वांजळे असे या आरोपी महिलेचे नाव असून वकील असल्याची बतावणी करत महिलेकडून धमकी दिली जात असल्याचीही माहिती आता पुढी आली आहे.
Pune Crime: गुंगीचं औषध पाजून महिलेकडून पुरुषावर अत्याचार, अश्लील फोटोही काढले
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील महिलेचे राहते घर हे कोल्हापूर (Kolhapur) येथील असून तक्रारदार पीडित पुरुषाच्या घरी देखील बळजबरीचा पुरुषावर प्रयत्न करण्यात आला होता. तर पुरुषाला बळजबरीने काशी विश्वनाथ या ठिकाणी घेऊन जात देखील अत्याचार केल्याची माहिती पीडित पुरुषाने दिली आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल करून घेत पुढील तपास सुरु केला आहे. मात्र या घटनेने शहरात एकच खळबळ उड़ली आहे.
Nagpur Crime : प्रेम प्रकरणाच्या वादातून तरुणाची हत्या; आरोपी ताब्यात
दरम्यान, नागपूरच्या गणेश पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत गाडीखाना चौकात काल मध्यरात्री एका तरुणाची हत्या करण्यात आलीय. अमन मेश्राम (25 वर्ष) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार प्रेम प्रकरणाच्या वादातून ही हत्या झाली आहे. काल रात्री साडेअकरा ते बारा वाजताच्या दरम्यान अमन मेश्राम गाडीखाना चौकात असताना काही मारेकऱ्यांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. लोकांनी गंभीर जखमी अवस्थेत अमनला रुग्णालयात नेले. मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता. आरोपी घटनास्थळीच त्यांची दुचाकी सोडून पळून गेले होते. रात्री उशिरा याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
- Pune News: पुण्यातील विश्रांतवाडीत बॉम्बमध्ये वापरण्यात येणारं जिलेटिन अन् वायर सापडली; परिसरात दहशतीचं वातावरण, पोलिसांनी चौकशी करताच सत्य समोर आलं
- Solapur Crime : वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून ग्रामपंचायत अधिकाऱ्याचे टोकाचे पाऊल; कुटुंबीयांकडून गंभीर आरोप; मृतदेह ताब्यात घेण्यास नकार, सोलापुरातील घटना