Pune crime: पुण्यात सातत्याने गुन्हेगारी घटनांच्या बातम्या कानावर पडत आहेत .किरकोळ कारणावरून मारहाणीच्या अनेक घटना समोर येत असताना आता पिंपरी चिंचवड मध्ये चक्क सुरक्षारक्षकावरच चाकूने हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . राम लोंढे असं हल्लेखोर आरोपीचे नाव असून चिंचवडमधील शांतीवन सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे .

Continues below advertisement

नेमके घडले काय?

चिंचवड गावातील शांतीबन सोसायटीमध्ये सुदाम कामिठे हे सुरक्षारक्षक म्हणून गेटवर बसले होते .आरोपीने सोसायटीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतात सोसायटीमध्ये कसा घुसतो असे विचारत सुरक्षारक्षक असणाऱ्या सुदाम कामेठे यांनी आरोपीस थांबवले .आरोपी राम लोंढे याने काही वेळ सुरक्षारक्षकासोबत बातचीत केली .नंतर अचानक चाकू काढत सुरक्षारक्षकावर हल्ला चढवला . या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी सुरक्षारक्षकाने शेजारीच असणाऱ्या टेबलवरील वीट उचलत प्रतिकार केला .मात्र आरोपीने सुरक्षारक्षकाच्या हातात असणारी वीट हिसकावून घेतली .व त्याच विटेने त्यांच्या डोक्यावर जीवघेणा प्रहार केला .हा संपूर्ण प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे .

आरोपी राम लोंढे पूर्वी याच शांतीवन सोसायटीमध्ये हाउसकीपिंगचे काम करायचा .मात्र व्यसनाधीन असल्याने त्याला कामावरून काढून टाकण्यात आले होते .याचाच राग डोक्यात धरत त्याने हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवलाय .सुरक्षारक्षकावर हल्ला केल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी राम लोंढे ला अटक केली आहे .घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत .

Continues below advertisement

पुण्यात गुन्हेगारी वाढली

सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे .खून हाणामाऱ्या चोरीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत .पुणे शहरात पोलिसांच्या नोंदीनुसार, 38 हजार गुन्हेगार वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे .यात आठ ते दहा हजारांपर्यंत सराईत गुन्हेगार असल्याची माहिती आहे .या गुन्हेगारांना लगाम घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले आहेत .पोलिसांसमोर या गुन्हेगारीला लगाम घालण्याचे मोठे आव्हान आहे. पुणे शहरात दरवर्षी सरासरी सात ते आठ हजार गुन्हे नोंदवले जात होते. मात्र, २०२१ नंतर त्यात लक्षणीय वाढ झाली आहे. ही आकडेवारी केवळ वाढती गुन्हेगारी दर्शवत नाही, तर समाजातील अस्थैर्य अधोरेखित करीत आहे. गुन्ह्यांच्या स्वरूपातही गेल्या काही वर्षांत बदल झाला आहे. पारंपरिक स्वरूपाच्या चोरी, दरोडा, खुनाच्या घटनांबरोबरच आर्थिक फसवणूक, सायबर गुन्हेगारी, महिलांवर बलात्कार, विनयभंग, हुंडाबळीच्या घटना वाढल्या आहेत.

हेही वाचा

Pune Crime News: परभणीचे पुण्यात राहणारी पोरं, पानशेतला फिरायला गेले अन् कांड झालं; सिगारेटचा धूर अन् हत्या...; घटनेनं पुणे हादरलं