Pune Crime news :  पुण्यातील वकिलाने (police) सहाय्यक पोलीस निरीक्षकाला (Pune crime) मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील मार्केट यार्ड (Pune Market Yard) परिसरात ही घटना घडली आहे. वकिलाने पोलीसाच्या अंगावर धावून जाऊन मुठीतील चावीने मारहाण केली आहे. यात पोलीस जखमी झाले आहेत. प्रतीक अंकुश तावरे असं या वकिलाचं नाव आहे.


मार्केट यार्ड पोलिसांनी  प्रतीक अंकुश तावरे या 35 वर्षीय वकिलाला अटक केली आहे. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक मदन कांबळे यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तक्रार (market Yard Police station) दाखल केली होती. त्यावरुन वकिलावर कारवाई करण्यात आली आहे. 29 डिसेंबर रोजी रात्री साडे अकरा वाजता घडला.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्केट यार्ड परिसरात ही घटना घडली आहे. बुराणी कॉलनीत भांडणे सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावेळी पोलीस निरीक्षक मदन कांबळे हे रात्री त्या ठिकाणी गेले होते. प्रतीक तावरे हे त्याच्या घराशेजारी राहणारे हर्षल लाहोटे यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत होते. यावेळी पोलिसांनी त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी वकिलाने दादागिरी केली. मी वकील आहे, असं सांगत पोलिसांना बाजूला सारलं आणि त्यांच्या अंगावर धावून जात हल्ला केला. यावेळी त्याच्या हातात गाडीची चावी होती. त्याच चावीने पोलीस निरीक्षकाच्या डोक्यावर हल्ला केला आहे. या प्रकरणी वकिलाला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनाच मारहाण होत असल्याने त्यांच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे. 


पोलिसही असुरक्षित...


पुण्यात पोलिसांना मारहाणीच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहेत.काही दिवसांपूर्वी पोलीस कर्मचाऱ्याच्या डोक्यात दगड घातल्याचा प्रकार उघडकीस आला होता. सोलापूर महामार्गावर लोणी टोल नाक्याजवळ हा प्रकार घडला होता. या मारहाणीत पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. पोलिस शिपाई संदीप धुमाळ  31 वर्षीय पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव होतं. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली होती.  दोन जणं रस्त्याच्या कडेला उभे राहून आरडाओरड करत होते.


त्यावेळी पोलीस त्या परिसरात गस्त घालत होते. त्यांनी दोघांना आरडोओरड न करता घरी जायला सांगितलं. यावरुन पोलीस आणि त्या मुलांमध्ये वादावादी झाली. ही वादावादी टोकाला गेली आणि बाजूला असलेला दगड दोन जणांनी पोलिसांच्या डोक्यावर मारला. या मारहाणीत पोलीस शिपाई संदीप धुमाळ जखमी झाले होते.