Pune Crime News पुणे : पुण्याच्या खेडमध्ये आंतरजातीय विवाह करणाऱ्या दाम्पत्याला जबर मारहाण (Pune Crime News) करण्यात आली. पोटच्या मुलीचं आई आणि भावांनी अपहरण केलं. विश्वनाथ गोसावी आणि त्याची पत्नी प्राजक्ता गोसावी 28 वर्षीय असे मारहाण झालेल्या दांपत्याचे नाव आहे. खडे पोलिसांनी मात्र मुलगी सुखरुप असून लवकरचं तिची सूटका केली जाईल, असा दावा केला. मात्र माझ्या पत्नीचा जीव धोक्यात असून, तिचं काही बरं वाईट केलं जाईल. अशी भीती जखमी पती विश्वनाथ गोसावीने व्यक्त केलीये. गेल्या वर्षभरात वारंवार खेड पोलिसांना याबाबत कळवलं होतं, त्यांनी ही प्रतिबंधात्मक कारवाई केली. मात्र ठोस काही झालं नाही, अखेर माझ्या पत्नीचं अपहरण झालं. अशी आपबिती पतीने मांडली आहे.

Continues below advertisement

प्रेमविवाहाला विरोध, माझ्या पत्नीच्या जीवाला धोका

विश्वनाथ गोस्वामी आणि माझी पत्नी प्राजक्त गोस्वामी आम्ही दोघांनी 5 ऑगस्ट 2024 रोजी प्रेमविवाह केला होता. मात्र आमच्या प्रेमविवाहाला प्राजक्ताच्या संपूर्ण कुटुंब आणि नातेवाईकांचा विरोध होता. मी गोसावी हिंदु असल्याने आणि ती मराठा हिंदु असल्याने आमच्या प्रेमविवाहाला विरोध झाला आणि त्यांच्या कुटुंबीयांकडून आम्हाला धमकी देण्यात आली. ते सारखे म्हणायचे आम्ही उच्च आहोत तुम्ही आमचं नाक कापलं, मी तुम्हाला जिवंत ठेवणार नाही आम्ही तुम्हाला ठार मारू, अशाप्रकारे धमकी देण्यात येत होती. यासाठी वेळोवेळी एकट्यात तर कधी प्रवासात आम्हाला अडवून धमकी देण्यात आली. ज्या ज्या वेळी या घटना घडत होत्या त्यावेळी आम्ही खेड पोलीस स्टेशनला याबद्दल माहिती दिली.

यापूर्वी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली, पण...

अशातच, एकदा माझ्या गाडीवर हल्ला करण्यात आला होता, तर एकदा माझ्या बिल्डिंगच्या आवारात काही गुंड घुसले होते. त्यावेळी माझ्या पत्नी प्राजक्ताने यासंदर्भात खेड पोलिसात तक्रार दाखल केली होती. यावेळी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. परंतू असं असताना हे सत्र सुरू राहिले. माझी 14 एकर शेती असून मी अनेक व्यवसाय करतो. तर माझी पत्नी इन्फोसिसला लीड मॅनेजर आहे. परंतू या साऱ्यांचं त्यांना काही नाही, उलट आपल्या लेकीलाच मारून टाकण्याची धमकी प्राजक्ताच्या कुटुंबीयांनी दिली.

Continues below advertisement

मला लोखंडी रॉडचा फटका मारला, चावा घेतला

अशातच काल (3 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास माझी पत्नी इमारतीवर असताना माझ्या पत्नीचा ओरडण्याचा आवाज आला. म्हणून मी जिन्याने वर जातं असताना प्राजक्ताचा भाऊ गणेश काशीद आणि तिची आई सुशीला काशीद इत्यादीसह काही गुंड प्राजक्ताला फरपटत, तिचे केस ओढत इमारतीतून खाली घेऊन जात होते. मी अडवण्याचा प्रयत्न केला असता प्राजक्ताच्या भावानं मला लोखंडी रॉडचा फटका मारला, चावा घेतला. यानंतर मी हतबल झालो आणि त्यांच्यापुढे काही करू शकलो नाही. त्यानंतर माझ्या पत्नीला घेऊन हे लोकं पसार झाले असून संदर्भात मला कुठलीही कल्पना नाही. याबाबत मी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे मात्र अद्याप त्या संदर्भात कुठलीही माहिती आम्हाला मिळालेली नाही. अशी माहिती विश्वनाथ गोस्वामी यांनी दिली. सोबतच माझ्या पत्नीचा दगाफटका तर झाला नाही ना, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

आणखी वाचा