Pune Crime Ayush Komkar: पुण्यातील टोळीयुद्धाचा बळी ठरलेल्या आयुष कोमकर याच्यावर सोमवारी दुपारी चार वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. आयुषचे आई-वडील गणेश आणि कल्याणी कोमकर हे वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणातील (Vanraj Andekar Murder Case) आरोपी असून ते नागपुर कारागृहात बंदिस्त आहेत. त्यांना आज मुलाच्या अंत्यविधीसाठी पुण्यात आणले जाणार आहे. त्यानंतर वैकुंठ स्मशानभूमीत आयुष कोमकर (Ayush Komkar Murder) याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. आंदेकर टोळीकडून असलेला धोका लक्षात घेता तिथे पोलीसांचा मोठा बंदोबस्त असणार आहे.

Continues below advertisement


आयुष उर्फ गोविंदा कोमकरवर गोळ्या झाडणाऱ्या दोन मारेकर्यांना पोलीसांच्या गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. यश पाटील आणि अमित पाटोळे अशी त्यांची नावे आहेत. यश पाटीलने आयुष कोमकरवर गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. आयुष कोमकर इमारतीच्या पार्किंगमधे गाडी पार्क करण्यासाठी येण्याआधी यश पाटील तिथे दबा धरुन बसला होता तर अमित पाटोळे दुचाकी चालू करुन थांबला होता. आयुष कोमकर याच्यावर गोळ्या झाडल्यावर यश पाटील आणि अमित पाटोळे त्या दुचाकीवरुन पसार झाले. तर आंदेकर टोळीचा प्रमुख सुर्यकांत उर्फ बंडू आंदेकर , त्याचा मुलगा कृष्णा आंदेकर यांच्यासह 13 जणांवर आयुष कोमकरच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्याआधीच सुर्यकांत  उर्फ बंडू आंदेकर आणि त्याचे साथीदार फरार झालेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


आयुष कोमकर हा 18 वर्षांचा असून तो महाविद्यालयात शिकत होता. गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी म्हणजे 5 सप्टेंबरला आयुष कोमकर हा क्लासवरुन घरी आला. तो पार्किंगमध्ये गाडी लावत असताना यश पाटील याने त्याच्यावर गोळ्या झाडल्या. आयुष कोमकरच्या शरीरात एकूण नऊ गोळ्या शिरल्या. त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच आयुष कोमकरचा मृत्यू झाला होता. यश पाटील आणि अमित पाटोळे यांनी घटनास्थळी दहशत माजवण्याचा प्रयत्नही केला. आयुषवर गोळीबार करताना हे दोघे, 'इथे फक्त बंडू आंदेकर व कृष्णा आंदेकरच’ असे ओरडत होते. या घटनेमुळे पुण्यातील टोळीयुद्ध आणि कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या टोळीयुद्धाने पुण्यात मोठी दहशत पसरली आहे.



आणखी वाचा


'टपका रे टपका, एक ओर टपका', संकेत की योगायोग? डीजेवर गाणं लावून आयुषला संपवलं? टोळीयुध्द पुन्हा भडकण्याची शक्यता


आयुष कोमकरला धडाधड 9 गोळ्या घातल्या, जमिनीवर पडताच मारेकरी म्हणाले, 'इथे फक्त....'