Pune Crime News : पुण्यातील पोलीस शिपायाने विवाहित इंजिनिअर महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नग्न फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत त्याने हे कृत्य केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. याप्रकरणी विक्रम फडतरे या पोलीस शिपायाला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. पीडितेने भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये तसा गुन्हा दाखल केला आहे. 34 वर्षीय विक्रम सध्या पुणे पोलिसांच्या वाहतूक विभागात कार्यरत आहे.
विक्रमने पीडितेला सप्टेंबर 2021मध्ये फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. विक्रमच्या फेसबुकबर काही ओळखीचे मित्र पीडितेला दिसले, म्हणून ती रिक्वेस्ट त्यांनी स्वीकारली. दोघांमध्ये ऑनलाईन गप्पा सुरु झाल्या. दोघे ही विवाहित असल्याने चर्चा मैत्रीपर्यंतच मर्यादित होते. मैत्री-मैत्रीत विक्रमने भेटण्याचं ठरवलं. सुशिक्षित आणि इंजिनिअर पीडिता आयटी कंपनीत नोकरीला असल्याने आणि विक्रम पोलीस असल्याने भेटण्यात गैर नसल्याचं तिला वाटलं. पण विक्रमच्या मनात नेमकं काय चाललंय याची कल्पना पीडितेला नव्हती.
पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे की, भेटीच्या सत्रात विक्रमने एकेदिवशी पीडितेला थेट पिंपरी चिंचवडमध्ये आणलं. एका लॉजमध्ये नेलं अन् जबरदस्ती सुरू केली. शारीरिक संबंध ठेवले अन् नग्नावस्थेतील फोटो-व्हिडीओ काढले. हेच फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेन असं अनेकदा धमकावत वारंवार इच्छेविरोधात जाऊन विक्रम फडतरे यानं बलात्कार केला, असा आरोप करत पीडितेने भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी पोलीस शिपाई विक्रमला बेड्या ठोकल्या आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
चाकूचा धाक दाखवून नौदल अधिकाऱ्याचा मोबाईल पळवला, मुंबई पोलिसांकडून दोघांना अटक
Nanded : व्यावसायिकांना खंडणी मागणाऱ्याच्या आवळल्या मुसक्या, नांदेडमध्ये एकाला अटक
Sangli Crime : सांगलीत तब्बल 50 किलो गांजा जप्त, गांजा विक्रीच्या वेळीच पोलिसांचा छापा, दोघांना अटक