Pune crime:  ठेकेदाराने कामावरून काढल्याचा राग मनात ठेवून दोन मजुरांनी बदला घेण्यासाठी भयंकर कृत्य केले आहे.  ठेकेदाराच्या तीन वर्षांच्या मुलीला पळवून घेऊन गेल्याचा प्रकार समोर आल्याने पुण्यातील विमाननगर भागात मोठी खळबळ उडाली आहे. मुलीचं अपहरण केल्यानंतर दोन्ही मजुरांनी तिला  इंद्रायणी एक्सप्रेसमध्ये चढवलं. यानंतर विमानतळ पोलिसांनी अवघ्या काही तासात अपहरण तीन वर्षांच्या मुलीची सुटका केली आहे. तसेच आरोपींनाही पोलिसांनी अटक केली आहे. प्रिन्स पाल आणि ओम नारायण पाल असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. हे दोन्हीही आरोपी झारखंडचे असल्याची माहिती मिळाली आहे.

Continues below advertisement

नेमकं घडलं काय? 

काम व्यवस्थित करत नसल्याच्या कारणाने ठेकेदाराने झारखंड मधील दोन मजुरांना कामावरून काढून टाकले. b कामावरून काढल्याचा राग मनात धरून दोघांनी बदला घेण्याचे ठरवले.  दोन्ही खजुरांनी ठेकेदाराच्या तीन वर्षांच्या मुलीचे अपहरण केले. ते इंद्रायणी एक्सप्रेस मधून तिला कुठेतरी घेऊन जात असल्याचं पोलिसांना समजतात लोहमार्ग पोलिसांच्या मदतीने दोघांना कल्याण रेल्वे स्टेशनवर जेरबंद करून मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली .

प्रिन्स पाल आणि ओम नारायण पालसे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत .वेगवेगळ्या बांधकाम साइटवर ठेकेदार हे मजूर पुरवण्याचं काम करतात .पण या दोन्ही मजुरांचं काम व्यवस्थित नसल्याने त्यांना कामावरून काढून टाकले होते .या गोष्टीचा राग मनात धरून ठेकेदाराच्या तीन वर्षांच्या मुलीचे सोमवारी त्यांनी अपहरण केले . बराच वेळ झाला तरी मुलगी घरात दिसत नाही म्हणून पालकांनी परिसरात शोधा शोध केली .पण शेवटी घाबरलेल्या पालकांनी पोलिसांना तक्रार केली .तसेच मजुरांवर संशय असल्याचेही बोलून दाखवलं .त्यानंतर पोलिसांनी तातडीने अधिक चौकशी करत शोध चालू केला .काम सोडून जाणाऱ्यांपैकी चौघेजण बिहार कडे चालले होते .पोलिसांनी सापळा रचत कल्याण रेल्वे स्थानकावरून दोन आरोपींसह तीन वर्षांच्या मुलीला ताब्यात घेतले .मुलीची सुटका करून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे .

Continues below advertisement

मैत्रिणीशी समलिंगी विवाह, आईवडिलांच्या दबावामुळे तरुणाशीही लग्न

पत्नीने पुणे येथे तिची मैत्रिणीसोबत समलैंगिक विवाह केल्याची धक्कादायक बाब तरुणाला तरुणीचा मोबाइल तपासल्यावर समजली, यानंतर त्याला मोठा धक्का बसला. तरुणीने तिच्या मैत्रिणीसोबत केलेले अश्लील चॅट, बाथरुममध्ये एकमेकींना विवस्त्र अवस्थेत केलेले व्हिडीओ कॉल, एकमेकींचे शारीरिक संबंधांचे व्हिडीओ, त्यात तरुणीने पती तरुणाचा कसा गेम करते बघ, ही सर्व माहिती त्याला तिचा फोन चेक केल्यानंतर समजली.