Pune crime News : महिलेने आणि तरुणाने एकाच घरात (pune) आत्महत्या (suicide) केल्याची धक्कादायक घडली आहे. पुण्यातील कात्रज परिसरात ही (pune news) घडना घडली आहे. या घटनेनं परिसरात (crime news) खळबळ उडाली आहे. 32 वर्षीय बरखा मंडल आणि 31 वर्षीय राजू फारुख शेख अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बरखा मंडल आणि राजू फारुख शेख या दोघांनीही एकाच घरात आत्महत्या केली आहे. दोघांच्याही आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही आहे. बरखा आणि राजू यांची बुधवार पेठेतील वेश्या वस्तीत ओळख झाली होती. दोघांनीही चार दिवसांपूर्वीच कात्रज परिसरात भाड्याने रुम घेतली होती. त्यामुळे घरासंदर्भात कोणतंही अग्रीमेंट करण्यात आलं नव्हतं. या घराचा दिवसभर दरवाजा उघडण्यात आला नव्हता. त्यामुळे शेजारी राहणाऱ्यांनी दरवाजा ठोकून आवाज देण्याचा प्रयत्न केला मात्र तरीही आतून कोणी दरवाजा न उघडल्याने शेजाऱ्यांना शंका आली. त्यांनी ताबडतोब भारती विद्यापीठ पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दरवाजा उघडून घराची पाहणी केली. राजूने घराच्या हॉलमध्ये तर बरखाने घराच्या किचनमध्ये ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं पोलिसांना आढळलं. 


बरखा पश्चिम बंगालची -
बरखा ही मुळची पश्चिम बंगालची आहे. राजू हा पुण्याचा आहे. दोघांचीही पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत ओळख झाली होती बरखा हिची मुले आणि पती आहेत. ते तिघेही मागील अनेक वर्षांपासून पश्चिम बंगामध्येच राहतात. चार दिवसांपूर्वीच भाड्याने घेतलेल्या रुममध्ये दोघांत काय घडलं आणि आत्महत्येचं नेमकं कारण काय असेल? याचा पोलीस शोध घेत आहे.


दोघांचेही मोबाईल पोलिसांच्या ताब्यात -
बरखा आणि राजू यांच्या आत्महत्येनंतर दोघांचेही मोबाईल भारती विद्यापीठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्या मोबाईलचा तपास पोलीस करत आहे. या मोबाईलमधून आत्महत्येचं कारण समोर येईल का? हे बघावं लागणार आहे. या दोघांचेही मृतदेह पोलिसांनी ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. भारती विद्यापीठ पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद करण्यात आली आहे. या आत्महत्येमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. घरमालकांनी अॅग्रीमेट केलं नसल्यामुळे दोघांबाबतही अधिक माहिती मिळत नाही आहे. बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या अनेकांनी या घटनेची धास्ती घेतली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.