मुंबई :पनवेल आणि मुंबईत (Mumbai) डान्सबारसर्रासपणे सुरू असल्याचा अनेकदा दिसून आलं आहे. काही महिन्यांपूर्वी चक्क गृहराज्यमंत्र्यांच्या सावली बारवरहीपोलिसांनी धाड टाकून कारवाई केली होती. त्यामुळे, मुंबईतील डान्स बारचा मुद्दा पुन्हा चर्चेत आणि केंद्रस्थानी आला होता. आता, मुंबईतील काशीमीरापोलिसांनीडान्सबारवर कारवाई करत 5 बारबालांची सुटका केली आहे. शहरातील काशीमीरा परिसरात मध्यरात्रीमहामार्गालगत असलेल्या “टार्जनडान्सबार”वरकाशीमीरापोलिसांनी धाड टाकली. या कारवाईत पोलिसांनी (Police) बारच्या आत बनवलेल्या दोन गुप्त केव्हेटीचापर्दाफाश करून त्यामधून 5 बारबालांची सुटका केली आहे. याशिवाय बारमध्ये काम करणाऱ्या एकूण 12 बारबालांचीहीपोलिसांनी मुक्तता केली. तसेच, बार मालक, मॅनेजर, वेटरआदींसह एकूण 21 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

बार माफियानेपोलिसांच्यानजरेआड करण्यासाठी बारच्या आत दोन गुप्त केव्हेटी तयार केल्या होत्या. एका केव्हेटीचा दरवाजा काचेमागेलपवण्यात आला होता. आत गेल्यावर आतून लॉक केल्यास बाहेरुन उघडणे अशक्यप्राय होते. दुसऱ्या गुप्त दरवाजासाठी इलेक्ट्रिक बोर्डवर तीन पिनचाप्लग लावावा लागायचा आणि त्याच्या बाजूचे बटन ऑन केल्यावर, गुप्त दरवाज्यावर जोरदार लाथ मारल्यावरच तो दरवाजा उघडायचा. अशी भन्नाट व गुंतागुंतीची यंत्रणा बसवूनबारमालकमॅनेजरबारबालांना लपवत असत.

पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे यांना मिळालेल्या खात्रीशीरमाहितीद्वारेपोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. रेडदरम्यानपोलिसांनी या गुप्त केव्हेटी शोधून काढत त्यातील मुलींची सुटका केली. या धाडीत पोलिसांनी बार मालक, मॅनेजर, वेटरआदींसह एकूण 21 जणांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांनी अशा अवैधबारमाफियांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

हेही वाचा

म्हाडाकडून गुडन्यूज! नाशिक मंडळातर्फे 478 घरांसाठी सोडत जाहीर; ऑनलाईन अर्ज नोंदणीसह जाणून घ्या डिटेल्स