ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 4 सप्टेंबर 2025 | गुरुवार
1) हैदराबाद गॅझेटसंदर्भात काढलेला जीआर हा सरसकटचा नाही, हा पुराव्यांचा जीआर आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, म्हणाले, छगन भुजबळ नाराज नाहीत https://tinyurl.com/5u38uztv सातारा गॅझेटिअरबाबत निर्णय न झाल्यास रस्त्यावर फिरू देणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा https://tinyurl.com/2brjapzb
2) मराठ्यांना आरक्षण द्यायलाच हवं, मात्र ते ओबीसींच्या ताटातलं नको, छगन भुजबळांच्या समता परिषदेची भूमिका, राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा https://tinyurl.com/2u2fyzzu समाजावर अन्याय झाला असेल तर छगन भुजबळ राजीनामा देणार का? नाराजीवरुन खासदार संजय राऊतांचा टोला https://tinyurl.com/389zptzw मनोज जरांगेंचे आंदोलन बदनाम करण्यासाठी मुंबईत दंगली घडवण्याचा डाव; शिंदे गटाचे माजी आमदार शहाजीबापू पाटलांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल https://tinyurl.com/4yhpjnx5
3) कुणाच्याही ताटातील कुणाच्या ताटात जाणार नाही, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य, म्हणाले ओबीसींच्या जनगणनेसाठी समिती सरकारला मदत करणार https://tinyurl.com/mv7h76t7 नागपूरमधील ओबीसी महासंघाचे साखळी उपोषण सहाव्या दिवशी मागे; 12 मागण्या मान्य; मंत्री अतुल सावेंची मध्यस्थी फळाला https://tinyurl.com/5ec32m5v
4) दक्षिण मुंबईमध्ये आंदोलन करण्यासाठी परवानगी देऊ नये, शिवसेना शिंदे गटाचे खासदार मिलिंद देवरांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र https://tinyurl.com/5azhpn78 मुंबईत आलेल्या सर्वसामान्य माणसाची काळजी कोणी केली का? त्यांच्यावर टीका करणं योग्य नाही, मिलिंद देवरांच्या पत्रावर मंत्री संजय शिरसाठांची प्रतिक्रिया https://tinyurl.com/5xhmt5rc
5) केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी काय केलं? बच्चू कडूंचा सवाल, म्हणाले, हे सरकार करोडपतींसाठी आहे का?https://tinyurl.com/yfdndddsसंविधानापेक्षा मोठे झालात का? तुमच्या बापाचं राज्य आहे का? दिशा समितीच्या बैठकीत ठाकरे गटाचे खासदार ओमराजेंकडून अधिकाऱ्यांची खरडपट्टी https://tinyurl.com/cekej45h
6) सिंधुदुर्गात राणेसाहेबच निर्णय घेतात, 6 नगरसेवकांना निलंबित करताच आमदार निलेश राणे आक्रमक; भाजपच्या निर्णयाला केराची टोपली https://tinyurl.com/mwrepazy दाढ दुखणं थांबलं असेल तर खाणाऱ्यांनी उत्तर द्यावं; सिडकोच्या 5 हजार कोटींच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी आमदार रोहित पवारांची मंत्री संजय शिरसाट यांच्यावर टीका https://tinyurl.com/n55k467n
7) दारू प्यायला पैसे न दिल्यानं नवऱ्याकडून पत्नीच्या डोक्यात हातोडीने वार; उपचारादरम्यान पत्नीचा मृत्यू, नाशिकमध्ये खळबळ https://tinyurl.com/mw4ew9pd प्रियकराच्या मदतीने पत्नीनेच काढला पतीचा काटा, धक्कादायक घटनेनं अमरावती हादरलं https://tinyurl.com/4xxayt85
8) देशात वस्तू व सेवा कराच्या रचनेत मोठा बदल, TV, AC, कपडे, खाद्यपदार्थ स्वस्त, कोणत्या वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी? पाहा संपूर्ण यादी https://tinyurl.com/tk8p4fkj केंद्राचा GST कपातचा निर्णय म्हणजे अमेरिकेच्या ट्रम्प टॅरिफला चोख प्रत्त्युत्तर; एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले विरोधकांना मोदीजींचं अभिनंदन करावंच लागेल https://tinyurl.com/2j7aets8
9) बाळासाहेब ठाकरेंच्या नातवाची बॉलिवूडमध्ये दणक्यात एन्ट्री; अनुराग कश्यप दिग्दर्शित निशानची या चित्रपटात ऐश्वर्य ठाकरेचा डबल रोल https://tinyurl.com/3vwv7d3m जमीन घोटाळाप्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान अडचणीत, स्वतःला शेतकरी दाखवू कोट्यावधींची जमीन खरेदी https://tinyurl.com/y2vn3aza
10) भारतीय क्रिकेटपटू अमित मिश्राची सर्व प्रकारच्या क्रिकेट फॉरमॅटमधून निवृत्ती, 7 दिवसांत तिसऱ्या क्रिकेटपटूने घेतली निवृत्ती https://tinyurl.com/496jarnp
एबीपी माझा Whatsapp Channel- https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w