मुंबई :  अमेरिकेत राहणाऱ्या मिलिंद बोरकर ने मेट्रोमोनी साइटवर मुलीची निवड करून लग्न करणारच्या स्वप्न पाहिलं.. पण त्याच स्वप्नांची किंमत त्याला स्वतावर गुन्हा नोंदवून मोजावी लागली. पुण्याच्या पिंपरीमध्ये राहणाऱ्या पल्लवी गायकवाडशी लग्न करण्यासाठी मिलिंद भारतात आला मात्र थोड्याच दिवसांनी पल्लवीच एका दुसऱ्या पुरुषाबरोबर संबंध असल्याच त्याला कळलं, इतकंच नाही तर मिलिंदला काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सुद्धा सापडले ज्यामुळे त्याने पल्लवी गायकवाडशी लग्न मोडलं, लग्न मोडल्यामुळे पल्लवी गायकवाडने आपल्याला बदनाम करत असल्याचं सांगत मिलिंद बोरकर वर गुन्हा नोंदवला मात्र आता या प्रकरणात नवीन वळण आलं आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी पोलिस लवकरच या प्रकरणात बी समरी रिपोर्ट म्हणजेच केस क्लोज करण्यासंदर्भातील रिपोर्ट कोर्टात सादर करणार आहेत, तर दुसरीकडे अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को सुपिरियर कोर्टामध्ये सुद्धा या प्रकरणाची सुनावणी महत्वाच्या वळणावर आहे.


सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्राथमिक तपासात पोलिसांना या केसमध्ये अनेकत्रुटी आढळल्यात. सगळ्यात महत्वाचा म्हणजे याच प्रकरणात आधीच दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल आहे, अशातच जर पिंपरी पोलीसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला आणि हा गुन्हा रद्द झाला तर तक्रारदार पल्लवी गायकवाड वर खोटा गुन्हा दाखल करण्यासंदर्भात अडचणी वाढू शकतात.


काय आहे संपूर्ण प्रकरण?


2007 साली अमेरिकेतील एका नामांकित कंपनीमध्ये मिलींड बोरकर काम करत होते, आपल्या करियरमध्ये ओळख आणि कुटुंबाची जबाबदारी पार पाडल्यानंतर मिलिंद बोरकर यांनी भारतात येऊन भारतीय मुलीशी लग्न करण्याचं ठरवलं. वर्ष 2018 पासून मिलिंद बोरकर यांनी मेट्रोमनी साइटवर मुली पाहणं सुरू केलं. त्यानंतर 2019 मध्ये मिलिंद यांना पुण्याच्या पिंपरी मोरवाडी येथे राहणारी पल्लवी गायकवाड नावाची मुलगी पसंत पडली. मेट्रोमोनी साइटवर भेट झाल्यानंतर दोघांच बोलणं सुरू झाला आणि दोघं एकमेकांच्या जवळ आले. 16 एप्रिल 2019 ला मिलिंद भारतात आले आणि पहिल्यांदा पल्लवीला भेटले. 2 जून 2019 रोजी मिलिंद बोरकर आणि पल्लवी गायकवाड यांचा साखरपुडा झाला साखरपुड्यानंतर मिलिंद लग्नाच्या तयारीत लागले होते.


मात्र त्याच दरम्यान पल्लवीच्या मोबाईलमध्ये मिलिंदला पल्लवीचे काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ सापडले. ते पाहून मिलिंदला धक्काच बसला. त्यानंतर मिलिंदने साखरपुडा मोडला. आरोपानुसार मिलिंदकडे पल्लवीच्या कुटुंबीयांनी पैशाची मागणी केली. मात्र पैसे न मिळाल्यामुळे पल्लवी गायकवाडच्या कुटुंबीयांनी  पिंपरीमध्ये मिलिंद बोरकर वर पल्लवीला बदनाम करण्याच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवला. मिलिंदने सुद्धा अमेरिकेच्या सॅनफ्रान्सिस्को सुपिरियर कोर्टात याचिका दाखल केली.. याचिकेनुसार 21 जुलै 2019 ला मिलिंदला पल्लवीच्या अनैतिक संबंधान बाबत कळलं. मिलिंदला पल्लवीचे आक्षेपार्ह फोटोज आणि व्हिडिओ पल्लवीच्या मोबाईल मध्ये सापडले, आपल्यात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत मिलिंद बोरकर ने ते फोटो आणि व्हिडिओ सुद्धा कोर्टात सादर केले आहेत.  साखरपुडा मोडल्यानंतर पल्लवी मिलिंदला बदनाम करण्यासाठी आणि त्याचे करिअर उद्धवस्त करण्यासाठी जाणीवपूर्वक खोटे गुन्हे दाखल करत आहे असा आरोप मिलिंदने केला आहे.


याबाबत पल्लवी गायकवाडशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होऊ शकला नाही.