Solapur Crime: पंढरपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पंढरपूर शहरातील न्यायालय परिसरात दोन अल्पवयीन मुलं दोन पिस्टल आणि जिवंत काडतूसांसह पोलिसांना सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. एका इसमाचा खून करण्याच्या उद्देशाने आलेल्या चौघांमधील हे दोन आरोपी असल्याचं पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील दोन आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याने पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे. मात्र यात दोन अल्पवयीन मुले गावठी पिस्टलसह आढळल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Crime News)
नक्की झाले काय?
एका इसमाचा खून करण्याच्या उद्देशाने आलेल्या चौघांमधील दोन अल्पवयीन आरोपींना शहर पोलिसांनी सापळा रचून पकडल्याचे समोर आले आहे . ताब्यात घेतलेल्या दोघांकडे प्रत्येकी एक लोखंडी देशी बनावटीचे पिस्टल, दोन मॅग्झीन व चार जिवंत काडतूस सापडली आहेत. या गुन्ह्यावेळी पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेलेल्या इतरांमध्ये यश अंकुशराव (रा. कोळी गल्ली), गोपाळ अंकुशराव ( रा.पंढरपूर) यांचा समावेश असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
याबाबत शहर पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, पंढरपूर गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जुना कासेगाव रोड येथे मोटार सायकलीवरून येत असताना, पोलिसांनी गराडा घालुन दोन अल्पवयीन आरोपींना जागीच पकडले. यातील दुसरी पोचले दुसऱ्या मोटार सायकलीवरुन येत होते, परंतु पोलिसांना पाहून पळून गेले. त्यांमध्ये यश अंकुशराव, गोपाळ अंकुशराव असल्याचे चौकशीत समोर आले आहे.
पोलिसांचा तपास सुरु
पकडलेल्या अल्पवयीनांकडे पिस्टल वापरण्याचा परवाना नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यास पंढरपूर शहर पोलिस ठाण्यास आणून भारतीय हत्यार कायदा चे 1959 कलम-3, 25, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 61 (2) तसेच मुंबई पोलिस अधिनियम कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक श्रीकांत घुगरकर, पोसई महादेव पिसाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. अधिक तपास पोलिस करीत आहेत. यातील दोन अल्पवयीन व दोन सज्ञान कोणाच्या हत्ये साठी आले होते याचा तपास पोलीस करीत आहेत.
हेही वाचा: