मुंबई : शिवसेनेचे डहाणू तालुका समन्वयक अशोक धोडी अपहरणप्रकरणी चौकशीसाठी बोलावण्यात आलेला संशयित आरोपी पोलिस चौकीतून फरार झाला आहे. अविनाश धोडी असं त्याचं नाव असून अंधाराचा फायदा घेऊन आरोपी फरार झाला. वेवजी पोलिस ठाण्यात हा प्रकार घडला आहे. 


शिवसेनेचे डहाणू तालुका समन्वयक अशोक धोडी अपहरणप्रकरणी त्यांचा भाऊ अविनाश धोडी हाच संशयित आहे. त्याच्यासह इतर दोन जणांविरोधात घोलवड पोलिस ठाण्यात कुटुंबीयांकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.


संशयित आरोपी म्हणून घोलवड पोलिसांनी अविनाश धोडी याला चौकशीसाठी बोलावलं होतं. घोलवड पोलीस ठाण्याच्या वेवजी पोलीस चौकीवर अविनाश धोडी हा चौकशीसाठी आला होता. पण नंतर अंधाराचा फायदा घेऊन तो फरार झाला. घोलवड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेकडून अविनाश धोडीचा शोध सुरू आहे. 


अपहरण झालेल्या अशोक धोडी यांच्या तपासासाठी पोलिसांची सहा पथकं वेगवेगळ्या भागात रवाना झाली आहेत. पोलिसांकडून सर्व सीसीटीव्ही तपासले जात आहेत. त्याचप्रमाणे  इतर मार्गाने पोलिसांकडून तपास सुरू आहे. काही वर्षापासून अशोक धोडी आणि त्यांचा भाऊ अविनाश धोडी यांच्यात संपत्तीबाबत वाद सुरू आहे. त्यामुळे असा प्रकार घडल्याचा संशय आता व्यक्त करण्यात येत आहे.  


ट्रेनच्या धडकेत तरुणीचा मृत्यू


मोबाईलचा अतिवापर एका विद्यार्थिनीच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना पालघरमध्ये आहे. कानातील इअरफोनमुळे ट्रेनचा आवाज न आल्याने ट्रेनच्या लागलेल्या धडकेत एका विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला. पश्चिम रेल्वेच्या पालघर मधील सफाळे रेल्वे स्थानकाजवळ रूळ ओलांडताना माकने गावातील वैष्णवी रावल या विद्यार्थिनीला राजधानी एक्सप्रेसने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला. 


माकने जवळ पश्चिम रेल्वेवर उड्डाणपूल नसल्याने येथील रहिवासी धोकादायक पद्धतीने रेल्वे रूळ ओलांडतात. त्यातच अनेक विद्यार्थ्यांच्या कानात नेहमीच इअरफोनमुळे असल्याने त्यांचं येणाऱ्या गाड्यांकडे देखील लक्ष नसतं यातूनच हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. वैष्णवीच्या या मृत्यूनंतर परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते आहे. 


ही बातमी वाचा: