Nida Khan: नाशिकमधील एका नामांकित आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण आणि धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी निदा खान (Nida Khan) हिच्यावर आता कंपनीने मोठी कारवाई केली आहे. कंपनीने निदा खानला तात्काळ प्रभावाने सेवेतून निलंबित (Suspend) केले असून, तसे अधिकृत पत्र जारी केले आहे.

Continues below advertisement

Nida Khan: पत्रात नेमकं काय म्हटलंय?

संबंधित कंपनीचे हे पत्र 9 एप्रिल रोजीचे असल्याची माहिती समोर आली आहे. निदा खान हिला पाठवलेल्या निलंबन पत्रात अत्यंत कडक शब्दांत सूचना दिल्या आहेत. "तुमच्याविरुद्ध एक अत्यंत गंभीर प्रकरण नोंदवले गेल्याची माहिती कंपनीला मिळाली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता व्यवस्थापनाने तुम्हाला तात्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे," असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

निलंबनासोबतच निदा खानचा कंपनीच्या अंतर्गत नेटवर्कवरील (Internal Network Access) प्रवेश तात्पुरता रद्द करण्यात आला आहे. तसेच, कंपनीच्या कोणत्याही कार्यालयात किंवा घरून काम (Work From Home) करण्यासही मनाई करण्यात आली आहे. या प्रकरणाबाबत इतर कोणत्याही कर्मचाऱ्याशी चर्चा करू नये आणि कडक गोपनीयता पाळावी, असे निर्देशही कंपनीने दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास अधिक कडक शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा पत्रात देण्यात आला आहे.  

Continues below advertisement

Nida Khan: का झाली कारवाई?

निदा खान ही संबंधित कंपनीत 'प्रोसेस असोसिएट' म्हणून कार्यरत होती. मात्र, तिच्यावर हिंदू तरुणींना धर्मांतरासाठी प्रवृत्त करणे, त्यांना टार्गेट करणे आणि विरोध करणाऱ्यांचा मानसिक व लैंगिक छळ करण्यासाठी चिथावणी दिल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणाचे धागेदोरे आंतरराष्ट्रीय स्तरावर जोडलेले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने, कंपनीने आपली प्रतिमा जपण्यासाठी आणि तपासात सहकार्य करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

Nida Khan: निदा खान अद्याप फरारच!

एकीकडे कंपनीने निलंबनाची कारवाई केली असली, तरी दुसरीकडे मुख्य संशयित निदा खान गेल्या 21 दिवसांपासून फरार आहे. तिने अटक टाळण्यासाठी वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू केली आहे. नाशिक पोलिसांचे विशेष तपास पथक (SIT) तिचा कसून शोध घेत असून, मुंबई, पुणे आणि भिवंडी परिसरात शोधमोहीम राबवली जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nashik Crime News: नाशिकच्या राजकारणात 'गुन्ह्यांची हॅटट्रिक'; एकाच दिवशी तीन बड्या नेत्यांवर गुन्हे, शहरात मोठी खळबळ

Nashik Crime News: जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा द्या, पण...; नाशिक धर्मांतर प्रकरणातील आरोपीच्या कुटुंबियांचा खळबळजनक आरोप, काय-काय म्हणाले?