Janai Bhosle Instagram Post For Asha Bhosle: म्युझिक इंडस्ट्रीतील महान गायिका आशा भोसले (Asha Bhosle) आता आपल्यात नाहीत. 12 एप्रिल रोजी वयाच्या 92 व्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे. आशा भोसले यांच्या निधनानंतर सिमेसृष्टीत (Entertainment News) न भरुन निघणारी  एक पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.  केवळ भारतीय सिनेसृष्टीतील नसून, इतर फॉरेन इंडस्ट्रीतील कलाकारांनीही श्रद्धांजली वाहिली. आशा भोसले यांच्या निधनाने त्यांची नात  जनाई भोसले अत्यंत दु:खी झाली आहे.   आपल्या आजीच्या निधनाने जनाई पूर्णपणे खचून गेली आहे. 13 एप्रिल रोजी आशा भोसले यांना अखेरचा निरोप देताना  ती ढसाढसा रडताना दिसली होती. दरम्यान, जनाई पुन्हा एकदा भावुक झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. आपल्या आजीच्या आठवणीत तिने एक पोस्ट शेअर केली आहे. 

आजीच्या आठवणीत जनाई भावुक (Janai Bhosle Instagram post about grandmother Asha Bhosle)

जनाईने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर उगवत्या सूर्याचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे.  तसेच फोटोवर तिनं  एक कॅप्शन देखील लिहिलं आहे, तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'सूर्य रोज उगवतो आणि मावळतो. माझी आजी म्हणायची त्याप्रमाणे, आयुष्य पुढे जातच राहिले पाहिजे. मला ऑनलाईन मेसेज करणाऱ्यांचे आभार.   आजीबद्दलचे तुमचे प्रेम पाहून मला दिलासा मिळतो. स्वत:ची काळजी घ्या',  या संदेशासोबत जनाईने आशा भोसले यांचे 'मैं आशा हूँ' हे गाणे शेअर केले आहे. 

जनाईने आपल्या इन्स्टाग्रामवर एक जुना व्हिडीओ शेअर केला आहे (Janai Bhosle on Asha Bhosles Death)

जनाई भोसलेने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये जनाई आजीसोबत बाल्कनीमध्ये दिसत आहे.  तिनं कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'त्या जशा आयुष्याचा आनंद घेत होत्या.  तसाच आनंद आपणही घ्यावा अशी त्यांची इच्छा होती'. जनाईने आपल्या इन्स्टाग्रामवर आणखी एक जुना व्हिडीओ  शेअर केला आहे. या व्हिडीओत गायिका आशा भोसले मुलाखत देत आहे, तर लहानपणीची जनाई आशा भोसले यांच्या मांडीवर बसली असल्याचं दिसत आहे.  जनाई आशा भोसलेंच्या अगदी जवळ होती, दोघांचे बॉण्ड स्ट्राँग होते, हे त्यांच्या पोस्टमधून दिसून येते.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

'दिल गलती कर बैठा है...' फेम गायक गपचूप अडकला लग्नाच्या बेडीत; बालपणीच्या मैत्रिणीसोबतच थाटला संसार