पुणे: नीट-यूजी पेपरफुटी (Neet Paper Leak) प्रकरणात लातूरमधील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरूरे याची सीबीआय कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. त्याच्यासह पुण्यातील डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमीतील भौतिकशास्त्राचा शिक्षक तेजस हर्षदकुमार शाह यालाही सीबीआयने (Neet Paper Leak) अटक करण्यात आली आहे. या दोघांना १ जून पर्यंत पाच दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. डॉ. शिरूरे याने तीन विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे प्रश्न मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा आरोप आहे. लातूरमधील आरसीसी क्लासेसचे प्रा. शिवराज मोटेगावकर, प्रा. पी. व्ही. कुलकर्णी या दोघांना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींच्या बाबतीत तपासात धक्कादायक खुलासे समोर आले आले आहेत. मनोज शिरुरेच्या लातूरमधल्या फ्लॅटवर  "विशेष क्लासेस" भरायचे अशी माहिती समोर आली आहे.(Neet Paper Leak)

Continues below advertisement

लातूरमधील बालरोग तज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरूरेच्या फ्लॅटवर प्राध्यापक प्रल्हाद कुलकर्णी क्लासेस घ्यायचा. आधी मोटेगावकर क्लासेसमध्ये देखील "प्लॅटिनम गोल्ड बॅच" चालायची अशी माहिती समोर आली आहे. प्लॅटिनम गोल्ड बॅचसाठी विद्यार्थ्यांकडून भरमसाठ शुल्क आकारले जायचे. कुलकर्णी-मोटेगावकर-शिरुरे नेक्ससबाबत सीबीआयकडून तपास सुरू आहे.(Neet Paper Leak) 

Neet Paper Leak: डॉ. शिरूरे-प्रा. कुलकर्णी-मोटेगावकर कनेक्शनाचा तपास 

नीट पेपर सेटर, भाषांतर करणारा प्रा. पी. व्ही. कुलकर्णी, डॉ. मनोज शिरूरे आणि प्रा. शिवराज मोटेगावकर कनेक्शन असल्याचा संशय सीबीआयला आहे, त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. डॉ. शिरूरे याने तिघांना मदत केली असल्याचा त्याचबरोबर कुलकर्णीकडून त्याने रसायनशास्त्राचे प्रश्न मिळविल्याचा देखील आरोप आहे. त्याचा तपास सुरू आहे. 

Continues below advertisement

Neet Paper Leak: आत्तापर्यंत १३ आरोपींना अटक, 

आतापर्यंत सीबीआयकडून ४९ ठिकाणी झाडाझडती घेतली आहे, यामध्ये महत्त्वाची कागदपत्रे, लॅपटॉप आणि मोबाइल फोन जप्त केले आहेत. आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, लातूर आणि अहिल्यानगर येथून १३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

Neet Paper Leak: सीबीआयच्या तपासात सापडला मनीषा हवालदारचा 'गॉड'

नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून अटक केलेल्या मनीषा हवालदार हिच्या पतीच्या मोबाइलमध्ये 'गॉड' नावाने सेव्ह असलेल्या नंबर सोबतचे संशयास्पद संवाद सीबीआयला आढळले होते. तो नंबर कोणाचा आहे आणि तो गॉड कोण आहे, असा प्रश्न निर्माण झाला होता, आता त्याचं सत्य समोर आलं आहे, गॉड नावाचं हे व्हॉट्सअॅप अकाउंट तेजस शाह वापरत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

सीबीआयने बुधवारी शाहच्या 'डॉ. अभंग प्रभू मेडिकल अकॅडमी' या कोचिंग सेंटरची झडती घेतली. शाह याने हवालदार हिला २० हजार रुपये देऊन भौतिकशास्त्राचा पेपर विकत घेतल्याची माहिती समोर आली होती. मनीषा हवालदार हिने सहआरोपी मनीषा मांढरे हिच्यासोबतचे व्हॉट्सॲप मेसेजेस डिलीट केल्याची कबुली दिली आहे. त्या चॅट्समधून आणखी काही महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI