Vidhan Parishad Election 2026: राज्यात महायुतीमध्ये विधान परिषदेच्या जागांवरुन रस्सीखेच सुरु असताना ठाण्यात रंजक राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. ठाणे विधानपरिषदेच्या (Vidhan Parishad Election 2026) जागेवरुन लढण्यासाठी शिंदे गटाच्या रवींद्र फाटक यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. मात्र, आता अचानक भाजपने (BJP) पडद्यामागे ठाणे विधानपरिषद निवडणुकीसाठी वेगळीच जुळवाजुळव सुरु केल्याची माहिती आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या ठाण्यात शिवसेनेला धक्का देण्यासाठी भाजपने (BJP) हालचाली सुरु केल्याची माहिती आहे. त्यासाठी बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर राजीव पाटील यांच्यासोबत भाजपने बोलणी सुरु केली आहेत. (Maharashtra Politics news)
प्राथमिक माहितीनुसार, भाजपने ठाणे विधानपरिषदेत हे नवीन समीकरण जुळवून आणल्यास शिंदे गटाला धक्का बसू शकतो. भाजप खासदार हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांनी त्यासाठी नुकतीच बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर राजीव पाटील यांची भेट घेतली. त्यामुळे राजीव पाटील हे ठाणे विधानपरिषदेच्या रिंगणात भाजपकडून उतरली, अशी चर्चा सुरु झाली आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र क्षितिज ठाकूर यांना ठाणे विधान परिषदेच्या रिंगणात उतरवण्याच्यादृष्टीने बोलणी झाल्याची माहिती होती. मात्र, एकनाथ शिंदे हे दिल्लीला गेल्याने चर्चेचे हे गाडे पुढे सरकले नव्हते. मात्र, आता भाजपने राजीव पाटील यांच्या पाठीशी ताकद उभे करायचे ठरवल्यास तो एकनाथ शिंदे यांच्यासाठी शह ठरु शकतो. त्यामुळे सध्या ठाणे विधानपरिषद निवडणुकीच्या रिंगणात रवींद्र फाटक, क्षितीज ठाकूर आणि राजीव पाटील अशा तीन नावांची चर्चा आहे. महायुतीमध्ये ठाण्याच्या जागेवर तोडगा निघून ती कोणाच्या वाट्याला जाणार आणि उमेदवार कोण असणार, याबद्दल आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
Thane Vidhan Parishad Election 2026: बविआ शिंदे गटात विलीन होण्याची चर्चा हवेतच विरणार?
ठाणे विधानपरिषदेच्या निवडणुकीत अनेक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. या जागेवरुन लढण्यासाठी शिवसेनेचे रवींद्र फाटक सुरुवातीपासून इच्छूक आहेत. मात्र, एकनाथ शिंदे बविआच्या क्षितीज ठाकूर यांच्या नावाचा विचार करत असल्याची माहिती समोर आली होती. तसेच बविआ पक्ष शिवसेनेत विलीन होणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली होती. त्यामुळे वसई विरारमधील बहुजन विकास आघाडीचा शिवसेनेला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. बहुजन विकास आघाडीचे एकूण 71 नगरसेवक आहेत. बहुजन विकास आघाडीचा पाठिंबा मिळाल्यास फायदा शिवसेनेला होईल. गेल्या काही काळात भाजपने ठाणे जिल्ह्यात आपली ताकद वाढवली आहे. सध्या भाजपकडे 444 नगरसेवकांचे संख्याबळ आहे. तर शिवसेनेकडे 346 मतं आहेत. बविआची साथ मिळाल्यास शिंदे गटाची ताकद वाढेल. मात्र, क्षितीज ठाकूर यांना विधानपरिषदेची उमेदवारी देण्याच्या मोबदल्यात हितेंद्र ठाकूर बविआ पक्ष शिवसेनेत विलीन करायला तयार होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
आणखी वाचा
