Nashik Crime News: नाशिक (Nashik) जिल्ह्याच्या देवळा (Deola) तालुक्यातील फुले माळीवाडा येथे आज सकाळी उघडकीस आलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह घरात आढळून आले असून, मृतांमध्ये पती, पत्नी आणि त्यांच्या दोन्ही अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. या घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट असून, प्राथमिक पाहण्यात ही घटना आत्महत्येची असल्याची शक्यता पोलिसांनी (Police) व्यक्त केली आहे. मृतांमध्ये गोविंद बाळू शेवाळे (40), त्यांची पत्नी कोमल गोविंद शेवाळे (35), मुलगी खुशी गोविंद शेवाळे (8) आणि दीड–दोन वर्षांचा मुलगा श्याम गोविंद शेवाळे यांचा समावेश आहे.  

Continues below advertisement

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंद बाळू शेवाळे याने स्वतः दोरीने फाशी घेऊन आत्महत्या केली असल्याचे दिसून येत आहे. तर पत्नी, एक मुलगी, एक मुलगा यांचा मृतदेह झोपलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले आहे. मात्र एकाच कुटुंबातील चार मृतदेह आढळल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. 

Nashik Crime News: पोलीस घटनास्थळी दाखल

घटनेची माहिती मिळताच देवळा पोलीस पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल हे घटनास्थळी उपस्थित असून अधिक तपासासाठी नाशिक विभागीय फॉरेन्सिक टीम उपस्थित झाले आहेत. पोलिसांकडून पंचनामा करण्यात आला आहे. पोलिसांनी मृतदेह पोस्टमार्टमसाठी सरकारी रूग्णालयात पाठवले आहेत. कुटुंबाने असा टोकाचा निर्णय का घेतला? याबाबत अद्याप कारण समोर आलेले नाही. या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. मात्र, फुले माळवाडी परिसरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे गावातील वातावरण शोकाकुल झाले आहे. आता या प्रकरणात नेमके काय समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Continues below advertisement

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Nanded Love Story Crime: नांदेडच्या लव्हस्टोरीचा रक्तरंजित शेवट, पोलिसांच्या तपासात मुलीच्या वडिलांकडून वेगळीच माहिती समोर, म्हणाले...

Chandwad Election: ईव्हीएम मशीन वाल्याशी बोलणं झालंय, तू एक कोटी रुपये दिले तर...; नगरपरिषद निवडणुकीत ईव्हीएम मशीन डिल? राजकीय वर्तुळात खळबळ