December Grah Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, अवघ्या 24 तासांनी डिसेंबर (December) महिन्याला सुरुवात होणार आहे. हा डिसेंबरचा महिना फार खास असणार आहे. कारण या महिन्यात 5 मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण (Grah Gochar) होणार आहे. यामुळे अनेक शुभ संयोग जुळून येणार आहेत. ग्रहांच्या या संक्रमणाने 5 राशींसाठी हा काळ सुवर्णकाळ ठरणार आहे. त्यानुसार, डिसेंबर महिन्यात सूर्य, मंगळ, बुध, गुरु आणि शुक्र ग्रह राशी परिवर्तन करणार आहेत. त्यामुळे या 5 लकी राशी (Zodiac Signs) कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.
डिसेंबर महिन्यात 'या' ग्रहांचं होणार संक्रमण
सर्वात आधी 5 डिसेंबर 2025 रोजी गुरु ग्रहाचं मिथुन राशीत संक्रमण होणार आहे. तर, 6 डिसेंबरला बुध ग्रहाचं वृश्चिक राशीत संक्रमण होईल. येत्या 7 डिसेंबर रोजी मंगळ ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहे. 16 डिसेंबर रोजी सूर्य ग्रहसुद्धा धनु राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 20 डिसेंबरला शुक्राचं धनु राशीत आगमन होणार आहे. वर्षाच्या शेवटी म्हणजेच 29 डिसेंबर रोजी बुध ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहे.
'या' राशींवर होणार शुभ प्रभाव
मेष रास (Aries Horoscope)
मेष राशीसाठी हा काळ फार शुभदायी असेल. या महिन्यात तुमच्याकडे पैशांची कमतरता नसणार आहे, उलट तुमच्यासाठी उत्पन्नाचे अनेक नवे मार्ग खुले होतील. तसेच, नोकरी निवडताना योग्य चौकशी करुनच निवडा. यामध्ये तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. तसेच, व्यवसायासाठी देखील अनेक संधी तुमच्याकडे उपलब्ध असतील. जे लोक अविवाहित आहेत त्यांच्यासाठी नवीन स्थळं येऊ शकतात.
सिंह रास (Leo Horoscope)
डिसेंबरमध्ये होणाऱ्या ग्रहांच्या संक्रमणाचा लाभ सिंह राशीच्या लोकांना देखील मिळणार आहे. या दरम्यान तुमचं वैवाहिक जीवन सुरळीत चालेल. तुमच्यासाठी नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होतील. तसेच, प्रमोशन देखील मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या बाबतीत तुम्ही प्रामाणिक असाल. व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. उत्पन्न चांगलं मिळेल.
कन्या रास (Virgo Horoscope)
कन्या राशीसाठी हा काळ शुभकारक असणार आहे. या काळात तुमच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण पाहायला मिळेल. तसेच, कुटुंबियांबरोबर तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता. या काळात तुमचा मानसिक तणाव दूर होईल. तसेच, नवीन कार्य हाती घेण्यासाठी तुम्ही फार इच्छुक असाल. धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल. मित्रांच्या सहकार्याने तुम्हाला अनेक कामे पूर्ण करता येतील.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीवर ग्रहांची शुभ दृष्टी पडणार आहे. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल. तसेच, नवीन कार्य करण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल. कामाच्या निमित्ताने तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांसाठी हा काळ फार शुभकारक असणार आहे. वैवाहिक जीवनात तुम्हाला तुमच्या जोडीदाराची पदोपदी साथ मिळेल.
धनु रास (Saggitarius Horoscope)
डिसेंबर महिन्यात ग्रहांचं संक्रमण जवळपास धनु राशीतच होणार आहे. त्यामुळे या राशीसाठी हा काळ फार शुभकारक ठरेल. या काळात तुमच्या धनसंपत्तीत भरभराट दिसून येईल. तसेच, तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्ही पैशांची गुंतवणूक देखील करु शकता. तसेच, नोकरीत देखील तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)