Nashik Accident News : नाशिकच्या निफाड (Niphad) तालुक्यातील चांदोरीमध्ये (Chandori) हिट अँड रनची (Hit and run) घटना घडली असून ट्रकच्या धडकेत बालिकेचा मृत्यू झालाय. सिद्धी लुंगसे असे विद्यार्थिनीचे नाव असून सायकलवर शाळेत जातांना विद्यार्थिनीला भरधाव वेगाने जाणाऱ्या आयशर ट्रकने चिरडले. यानंतर संतप्त जमाव रस्त्यावर उतरत त्यांनी रास्तारोको आंदोलन केले. तीन ते चार ट्रक चालक भरधाव वेगाने वाहन चालवित असताना अपघात झाल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. संशयित वाहनचालकांवर कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर जमाव पांगला. निफाड-संभाजीनगर रोडवर रोजच भरधाव वेगाने वाहने चालवत असल्याने नागरिकांना जीव मुढीत धरुन प्रवास करावा लागत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.  

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिक-संभाजीनगर महामार्गावरील नागपूर फाटा परिसरात सोमवारी (ता. ३० जून) हिट अँड रनची घटना घडली. चांदोरीतील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये सातवीत शिकणारी सिद्धी मंगेश लुंगसे शाळेत जाण्यासाठी सायकलने निघाली होती. मात्र, वाटेत भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने तिला चिरडले, ज्यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण चांदोरी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघातानंतर त्या डंपरने समोरून येणाऱ्या दुचाकीला देखील जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डंपरचा वेग अतिशय प्रचंड होता, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले असून या अपघातामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण पसरले आहे.

संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको

ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अपघातामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी चांदोरी-निफाड रस्त्यावर जोरदार रास्ता रोको आंदोलन छेडले. डंपर चालकावर त्वरित आणि कठोर कारवाई करण्यात यावी, अशी तीव्र मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या होत्या आणि काही काळासाठी संपूर्ण वाहतूक ठप्प झाली होती. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संतप्त जमावाशी संवाद साधत समजूत काढली आणि आंदोलकांना शांत केले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

Nashik News: बांधकाम साईटच्या कृत्रिम तलावात पोहायला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने आक्रीत घडलं; नाशिकमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत

Latur Crime News : हृदयद्रावक! चार वर्षाच्या चिमुकलीनं चॉकलेट मागितलं, जन्मदात्यांने अतिशय क्रूरपणे लेकीला संपवलं, घटनेनं लातूर हादरलं