Nanded Crime : राज्यभरात गाजलेल्या नांदेड (Nanded) महिपाल पिंपरी येथील ऑनर किलिंग प्रकरणात (Honour Killing) दररोज अनेक महत्त्वाच्या बाबी उघडकीस येत आहेत. यात काल (29 जानेवारी) रविवारी नांदेड पोलीस (Nanded Police) पुन्हा आरोपींना घेऊन परिसरात गेले होते. यावेळी तळणीजवळ कॅनॉलच्या बाजूला शुभांगीची आणखी काही हाडे सापडली आहेत. यापूर्वी जोगदंड यांच्या शेतातून आणि हिवरा परिसरातून काही हाडे गोळा करण्यात आली होती. ही हाडे आता न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. महिपाल पिंपरी येथील शुभांगी जोगदंड या भावी डॉक्टरची वडिलांसह कुटुंबातील लोकांनीच गळा आवळून हत्या केली होती. त्यानंतर प्रेत शेतात जाळून त्याची राख आणि हाडे वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन विल्हेवाट लावली होती. लिंबगाव पोलिसांना कुणकुण लागताच त्यांनी ऑनर किलिंगचा हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. त्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती.
शॉक लागून मृत्यू झाल्याचा बनाव कुटुंबियांनी रचला
दरम्यान या प्रकरणात सुरुवातीला शुभांगीचा शॉक लागून मृत्यू झाला असून, तिचे अंत्यसंस्कार केल्याचा बनाव कुटुंबियांनी रचला होता. तसेच तपासही भरकटवण्याचा प्रयत्न आरोपींकडून होत होता. परंतु पोलिसांनी मोबाईल फोनच्या लोकेशन आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरु ठेवला आहे. मयत शुभांगीची काही हाडे मिळाली होती. तसेच जोगदंड आणि इतर चार हिवरा भागातही कवटीचा भाग आढळून आला होता. काल रविवारी अनेक खुलासे समोर आले आहेत, ज्यात पुन्हा या आरोपींना पोलिसांनी घटनास्थळावर नेण्यात आले होते.
गावात दहशतीचे वातावरण
या प्रकरणी गावातील अनेक नागरिकांची चौकशी करण्यात आली आहे. ज्यात महिपाल पिंपरी गावात दोन गट आहेत. त्यामुळे या खून प्रकरणाची माहिती असल्याचे सांगून आरोपींनी गावातील काही जणांची नावे पोलिसांसमोर घेतली होती. पोलिसांनी त्या सर्वांची चौकशी केली आहे. या घटनेमुळे गेल्या चार दिवसांपासून गावात दहशतीचे वातावरण आहे. दरम्यान महिपाल पिंपरी परिसरातील कॅनॉलमध्ये शुभंगीचे हाडे फेकल्याची माहिती पोलिसांना आरोपींकडून मिळाली, त्या ठिकाणाहून काही हाडे गोळ केली असून आता ही सर्व हाडे न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत.
काय आहे प्रकरण?
महिपाल पिंपरी गावातील शुभांगी जोगदंड या तरुणीची 22 जानेवारी रोजी क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. ती नांदेड इथे BAMS तृतीय वर्षात वैद्यकीय शिक्षण घेत होती. आत्याच्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याने वडिलांसह भावांनी मिळून मुलीला क्रूरपणे मारहाण करुन हत्या केली. तसेच तिला जाळून तिची राख उधळून लावल्याची माहिती होती. या प्रकरणी हत्येनंतर चार दिवसांनी पाच जणांवर 302 या कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. यात मुलीचे वडील भाऊ, मामा, दोन चुलतभाऊ अशा पाच जणांचा समावेश आहे. प्रतिष्ठेपोटी वडील आणि भावांनी तरुणीला जीवे मारल्याचे कळते. मैत्रिणीने राज्य महिला आयोगाकडे तक्रार केल्याने ही हत्येची घटना उघडकीस आली होती.
संबंधित बातमी