Nanded Crime: नांदेडमध्ये अंतरजातीय प्रेमसंबंधातून सक्षम ताटे (Saksham Tate) या 19 वर्षीय युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. हा खून सक्षमची प्रेयसी आंचल मामीडवार (Anchal Mamidwar) हिच्या वडिलांनी आणि भावांनी केला आहे. या भयंकर घटनेनंतर आंचलने सक्षमच्या पार्थिवाशी विवाह केला. एवढ्यावर न थांबता तिने स्वतःच्या वडील आणि दोन भावांविरोधात पोलिसात धाडसाने साक्षही दिली आहे. सक्षमच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीदेखील आंचलने केली आहे. तर पोलिसांनी (Police) या प्रकरणात सर्व आरोपींना अवघ्या 12 तासात अटक केली आहे.  (Nanded Crime)

Continues below advertisement

घटनेनंतर आंचल थेट सक्षमच्या घरी पोहोचली. आपल्या प्रियकराच्या पार्थिवाशी तिने विवाह केला. “सक्षम मृत्यूनंतरही जिंकला… आणि माझे घरचे हरले,” असे भावनिक उद्गार तिने काढले. अंत्यविधीपूर्वी सक्षमच्या पार्थिवासमोरच त्याच्या नावाचे कुंकू कपाळावर लावून तिने सर्वांना स्तब्ध केले. “मी आयुष्यभर सक्षमच्या घरात त्याची पत्नी म्हणूनच राहणार,” असा ठाम निर्धार तिने व्यक्त केला.

Nanded Crime:  आंचलच्या आईबाबत धक्कादायक खुलासा 

या प्रकरणात आता आणखी मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. सक्षमची हत्या होण्याच्या दोन तास आधीच आंचलची आई जयश्री मामीडवार सक्षमच्या घरी गेल्याची माहिती समोर येत आहे. तेथे जाऊन तिने सक्षमला धमकी दिली आणि आमच्या पोरीपासून दूर राहा, असे सांगितले. यानंतर अवघ्या दोन तासांनी सक्षम ताटे याची आंचल मामीडवार हिच्या वडिलांनी आणि भावांनी हत्या केली. 

Continues below advertisement

Nanded Crime: सक्षमच्या आईची भावनिक प्रतिकिया

या प्रकरणावर सक्षमची आई संगीता ताटे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सक्षमच्या मृत्यूच्या दुसऱ्या दिवशी आंचल मला पोलीस स्टेशनमध्ये भेटली. ती खूप रडत होती आणि माझ्याबरोबरच ती घरी आली. माझ्या गळ्यात पडून ती रडली आणि म्हणाली की मी तुमच्याच घरी राहीन. त्या दिवशी मी तिला माझ्या घरी घेऊन आले. जसं मी माझ्या मुलावर प्रेम केलं, तसंच प्रेम मी आंचलवरही करीन. तिला मुलगी न मानता, सक्षमप्रमाणेच माझा मुलगा मानेल. तिच्यात मला सक्षम दिसतो. मी तिच्यावर माझ्या स्वतःच्या लेकीसारखं प्रेम करेन. जोपर्यंत माझा जीव आहे, तोपर्यंत मी तिच्यावर प्रेम करत राहीन. तिने माझी साथ सोडली नाही, तर मी देखील तिची साथ आयुष्यभर सोडणार नाही. माझी एकच मागणी आहे की, माझ्या मुलाला न्याय मिळावा,” असे त्यांनी म्हटले आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

पोलिसांनीच सांगितलं, बहिणीचं ज्याच्यासोबत लफडं त्याला मार अन्.....; नांदेडच्या रक्तरंजित घटनेनंतर आंचलचा खळबळजनक आरोप