Nanded Crime: नांदेड येथील सक्षम ताटेच्या (Saksham Tate) हत्याकांडाने महाराष्ट्रासह देशभरात संतापाची लाट उसळली असताना, या प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. सक्षम आणि आचलचे नाते परस्पर संमतीने असल्याचे एका महिला पोलिसाने स्पष्ट सांगूनही आंचलच्या (Anchal Mamidwar) कुटुंबाने POCSO प्रकरण पुढे ढकलण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच मामिडवार कुटुंबाने सक्षमला धर्मांतराची ऑफर दिल्याचाही धक्कादायक उलगडा झाला आहे.
Nanded Crime: सक्षम-आचलचं प्रेम : महिला पोलिसाने सांगितलेले सत्य
आचल मामिडवार आणि सक्षम ताटे यांची ओळख 2022 मध्ये झाली. दोघांचे प्रेम घट्ट झाल्यानंतर आंचलच्या कुटुंबाने तिला घरात बंद करून ठेवले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून कुटुंबाने सक्षमवर POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर प्रकरण हाताळणाऱ्या एका महिला पोलिसाने स्पष्ट सांगितले होते की, दोघांचे नाते हे परस्पर संमतीने आहे, POCSO लागू होत नाही. परंतु आचलच्या कुटुंबाने हे ऐकण्यास पूर्ण नकार देत सक्षमविरुद्ध तक्रार कायम ठेवली. जेव्हा आंचल 18 वर्षांची झाली, तेव्हा तिने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन निवेदन दिले की ती POCSO प्रकरण मागे घ्यायचे आहे, अशी माहिती आता समोर आली आहे.
Nanded Crime: सक्षमला धर्मांतराची ऑफर
सक्षमचे कुटुंब आंबेडकरवादी बौद्ध असून आचलचे कुटुंब पद्मशाली हिंदू आहे. जातभेद आणि प्रतिष्ठा या कारणांमुळे मामिडवार कुटुंब या नात्याला तीव्र विरोध करत होते. या विरोधात त्यांनी सक्षमवर मानसिक दबाव टाकायला सुरुवात केली. धक्कादायक बाब म्हणजे मामिडवार कुटुंबाने सक्षमला हिंदू धर्म स्वीकारल्यास नातेसंबंध मान्य करू असे सांगितले होते. सक्षमनेही आचलसाठी धर्मांतर करण्याची तयारी दर्शवली, परंतु कुटुंबाने दाखवलेला स्वीकार हा केवळ नाटक असल्याचे नंतर उघड झाले.
Nanded Crime: आचल-सक्षमची प्रेम कहाणी कुठून सुरु झाली?
दरम्यान, आचल आणि सक्षमची भेट ऑक्टोबर 2022 मध्ये झाली. ही भेट आचलच्या आयुष्यात एक मोठं वळण ठरली. पहिल्या भेटीतच दोघेही प्रेमात पडले. त्यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना शोधले, नंबरची देवाणघेवाण केली आणि एका महिन्यातच त्यांचे नाते घट्ट झाले. ते एकाच परिसरात राहत होते आणि दहावीनंतर एकाच कोचिंग क्लासला जात होते, त्यामुळे त्यांना भेटणे सोपे झाले. दहावीपूर्वी सक्षम लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे शिक्षणासाठी राहत होता, त्यामुळे आचल त्याला याआधी ओळखत नव्हती.
आणखी वाचा