Nanded Crime: आंतरजातीय प्रेमसंबंधातून 19 वर्षीय सक्षम ताटेच्या (Saksham Tate) निर्घृण हत्येनं संपूर्ण नांदेड जिल्ह्यास (Nanded Crime) राज्य हादरला आहे. प्रेयसी आंचल मामीडवार (Anchal Mamdiwar) हिच्या वडील आणि भावांनी मिळून सक्षमची हत्या केली आहे. या घटनेनंतर आंचलने सक्षमच्या मृतदेहासमोर त्याच्याशी विवाह करत आयुष्यभर त्याच्या कुटुंबासोबत राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आरोपींमध्ये आंचलचे दोन्ही भाऊ आणि वडिलांना अटक केलीय. एकंदरीत या घटनेनंतर नांदेडसह राज्यात एकच खळबळ उडाली असून समाजमन सुन्न झालंय.  काल (1 डिसेंबर) सक्षम ताटे याचा वाढदिवस होता. वाढदिवसाच्या चार दिवसापूर्वीच त्याच्यासोबत घात झाला. दरम्यान, यावर बोलताना प्रेयसी आंचलने जाड अंतःकरणाने जुन्या आठवणींना उजाळा देत आज तो नाहीये पण त्याच्या आठवणी माझ्या मनात नेहमी राहणार असल्याचे आचलने सांगितले. सोबतच आंचलने काही धक्कादायक माहितीही दिली आहे.

Continues below advertisement

Nanded Love Story Crime: माझ्यासाठी तो धर्म स्वीकारणार होता, पण....

सक्षमचा (1 डिसेंबर) वाढदिवस आहे. वाढदिवसानंतर आम्ही पळून जाऊन लग्न करणार होतो. आम्ही लग्न करण्याचं ठरवलं होतं. आम्ही जेव्हा जेव्हा पण भेटायचो त्यावेळी मी त्याला लग्नासंदर्भात बोलत होते. त्याच्या वाढदिवसानंतर आम्ही पळून जाऊन लग्न करणार होतो. मात्र त्यानं माझ्या वडिलांचा कायम आदर कर आपण सर्वांची परवानगी लग्न करु, असा विश्वास तो मला द्यायचा, पण आमच्या प्रेमाबद्दल घरच्यांना समजल्यानंतर विरोध करत घात केला. दरम्यान माझ्यासाठी तो धर्म स्वीकारणार होता, असा धक्कादायक खुलासा आंचल हिने केला.

Continues below advertisement

सक्षम आणि आंचल याचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, सक्षम वेगळ्या जातीचा असल्याने हे प्रेमसंबंध आंचलच्या घरच्यांना मान्य नव्हते. सक्षम ताटे जेलमधून सुटून आल्यानंतर माझ्या कुटुंबातील लोक त्याच्या खूनाचा कट रचत होते, असे आंचलने सांगितले. आमच्या प्रेमसंबंधाला विरोध असल्याने  माझ्या वडिलांनी आणि भावाने सक्षमला मारले पण ते हरले आणि माझा प्रियकर मरून पण जिंकला. आपल्या वडिलांना आणि भावाला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणीही आंचलने केली. पोलिसांनी आंचलचे वडील गजानन मामीलवाड यांच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.  जयश्री मदनसिंह ठाकूर,गजानन बालाजीराव मामीलवाड,साहील ठाकूर,सोमाश लखे, वेदांत अशी आरोपींची नावे आहेत.

Nanded Crime: सक्षमला धमकी, आमच्या पोरीपासून दूर राहा...

या प्रकरणात आता आणखी मोठा आणि धक्कादायक खुलासा झाला आहे. सक्षमची हत्या होण्याच्या दोन तास आधीच आंचलची आई जयश्री मामीडवार सक्षमच्या घरी गेल्याची माहिती समोर येत आहे. तेथे जाऊन तिने सक्षमला धमकी दिली आणि आमच्या पोरीपासून दूर राहा, असे सांगितले. यानंतर अवघ्या दोन तासांनी सक्षम ताटे याची आंचल मामीडवार हिच्या वडिलांनी आणि भावांनी हत्या केली. 

आणखी वाचा 

पोलिसांनीच सांगितलं, बहिणीचं ज्याच्यासोबत लफडं त्याला मार अन्.....; नांदेडच्या रक्तरंजित घटनेनंतर आंचलचा खळबळजनक आरोप