Nanded: नांदेडमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे .कंधार तालुक्यातील एका खासगी संस्थेवर काम करणाऱ्या शिक्षकाचा एका लॉजमध्ये मृतदेह आढळून आला आहे . अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव पाटील जवळ असणाऱ्या हॉटेल्स स्वराज्य लॉजमध्ये शनिवारी (2 Aug ) सकाळी ही घटना घडली .आशिष भाऊसाहेब शिंदे असं मृत शिक्षकाचे नाव आहे .  रूम सर्व्हिससाठी वेटरने खूप वेळा दार वाजवलं तरीही आतून कसलाच आवाज न आल्यानं रूमचं दार उघडण्यात आलं त्यावेळी आशिष शिंदे या शिक्षकानं पंख्याला गळफास लावून घेतल्याचं समोर आलं आहे . (Nanded news )

Continues below advertisement

नेमकं घडलं काय ?

नांदेड मधील अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव  परिसरात हॉटेल स्वराज फॅमिली रेस्टॉरंट आणि लॉज मध्ये आशिष भाऊसाहेब शिंदे हे शिक्षक मुक्कामास होते . शनिवारी सकाळी शिंदे आपल्या रूममध्ये मृत अवस्थेत आढळून आले .रूम सर्विस साठी सकाळपासून वेटरने दरवाजा वाजवला तरीही आतून कसलेही उत्तर किंवा आवाज आला नाही .संशयास्पद परिस्थिती वाटल्याने त्यामुळे हॉटेल रूमचा दरवाजा तोडण्यात आला . दरवाजा तोडताच आशिष शिंदे यांचा मृतदेह पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला .

हॉटेलच्या व्यवस्थापकाने तात्काळ अर्धपूर पोलिसांना घटनेची माहिती दिली . त्यानंतर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम व इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली .पोलिसांनी शिक्षक आशिष शिंदे यांना रुग्णवाहिकेने नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं .डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर क्षमविच्छेदनासाठी मृतदेह पाठवण्यात आला .व त्यानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला .पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून शिक्षकाने आत्महत्या का केली यासंदर्भात तपास सुरू आहे .या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे .

Continues below advertisement

जीवे मारण्याची धमकी देत दुसऱ्या गावात घेऊन गेला

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील एका गावातल्या एका 20 वर्षीय तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील एका गावातल्या एका 20 वर्षीय तरुणीला अहिल्यानगर येथे नेत दोन महिन्यांपासून वारंवार लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारी वरून जऊळका पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी तनुज गौरकार याला अटक करण्यात आली आहे.एप्रिल महिन्यात आरोपीने या तरुणीला जीवे मारण्याची धमकी देऊन अहिल्यानगर जिल्ह्यातील घडवणी या गावात ठेवलं आणि तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शरिरसंबंध ठेवले, अखेर आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीने पोलिसांकडे धाव घेतली.