नागपूर: रामटेक जवळच्या सितापार येथे राहाणारा तरुणाला रामटेक येथील गडमंदीर रस्त्यावर क्षुल्लक कारणावरून बेदम मारहान केली, त्यामध्ये गंभीर दुखापत होवून त्या तरूणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. विवेक विश्वनाथ खोब्रागडे (21) असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
विवेक विश्वनाथ खोब्रागडे आपल्या मित्रासोबत शनिवारी रामटेक शोभायात्रा पाहण्यासाठी गेला होता. तेव्हा रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास गडमंदिर रामटेकवरुन मोटार सायकलने तो व त्याचा मित्र घरी परत येण्याकरीता निघाले. तेव्हा गडमंदिरवरुन खाली उतरत असताना रत्यात आरोपी मनीष बंडुजी भारती (वय 36 वर्ष) आणि त्याच्या मित्रांनी विवेकची मोटार सायकल थांबवली. तुमच्या मोटार सायकलने माझा बाईकला धक्का मारली असं सांगून त्याला शिविगाळी केली.
विवेक आणि त्याचा मित्र फजान खान याला आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. काही वेळांनी फैजाजचा भाऊ तेथे आल्यानंतर मनिष भारतीने त्याच्या गाडीचे नुकसान झाल्याचे सांगून फैजानचा भावाकडून 10,000 रु घेतले. फैजान आणि विवेक यांनी घाबरून पोलीस स्टेशन रामटेकला तक्रार देण्यासाठी न जाता घरी गेले. पण आरोपींच्या मारहाणीमध्ये विवेक गंभीर जखमी झाला होता.
त्यानंतर विवेकला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विवेकचे वडील विश्वनाथ खोब्रागडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रामटेक पोलिसांनी अप क्र.877/23 कलम 302, 341, 323, 504, 506, 34, भा द वी सह कलम 3 (2)(V) अनु. जा. अनु जमाती प्रती. अधिनियम नुसार गुन्हा नोंद केलेला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी रामटेक हे करत आहेत.
धुळ्यात 22 वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या
धुळे शहरातील (Dhule City) नकाने परिसरातील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या मागे असलेल्या बालाजी नगर (Balaji Nagar) येथे एका 22 वर्षीय तरुणीची गळा चिरून निर्घुण हत्या झाल्याचे समोर आहे. ही धक्कादायक घटना 22 नोव्हेंबर 2023 रोजी संध्याकाळच्या सुमारास घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून भीतीचे वातावरण आहे.
धुळे शहरातील नकाने रोड येथील विघ्नहर्ता हॉस्पिटलच्या पाठीमागे असलेल्या बालाजी नगर येथे ही मृत तरुणी वास्तव्यास होती. निकिता पाटील असे या मृत तरुणीचे नाव आहे. ही तरुणी महाविद्यालयात शिक्षण घेत होती. संध्याकाळच्या सुमारास ही घरी एकटी असल्याचे संधी साधत अज्ञात व्यक्तीने तिच्या घरात शिरून गळ्यावर आणि पोटावर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात तिची निर्घुण हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली.
ही बातमी वाचा: