Nagpur news Update : नागपूर शहरात पुन्हा एकदा दिवसा-ढवळ्या हत्येची घटना घडली आहे. धारधार शस्त्राने वार करून तरूणाची हत्या करण्यात आली आहे. गिट्टीखदान पोलीस स्टेशन आणि गुन्हेशाखा कार्यालयाच्या जवळ ही हत्या झाली आहे. नारायण गयाप्रसाद द्विवेदी असे हत्या झालेल्या तरूणाचे नाव आहे. 

Continues below advertisement

शहरातील गजबजलेल्या काटोल रस्त्यावर सकाळी नारायण द्विवेदी हे दुचाकीने ड्युटीवर जाण्यासाठी निघाले होते. यावेळी अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. आरोपींनी नारायण द्विवेदी यांच्यावर अनेक वार केल्याने ते दुचाकीसह रस्त्यावर कोसळले. त्यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी घटनास्थळा वरून पसार झाले. 

जुन्या वादातून हत्या झाल्याचा संशय 

Continues below advertisement

आरोपींनी नारायण द्विवेदी यांची हत्या केल्यानंतर मृतदेहाचा मोबाईलवर फोटो काढून एका व्यक्तीला पाठवला. त्यांनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. काही दिवसांपूर्वी नारायण द्विवेदी हे सुरेंद्रगड वस्तीत भाड्याने राहत होते. मात्र, घर मालकाच्या मुलाचे वर्तन योग्य नसल्याने ते दुसऱ्या भागात राहण्यास गेले होते. त्या वादातून नारायण द्विवेदी यांची हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली याबाबत पोलीस अधित तपास करत असून फरार झालेल्या आरोपींचा देखील शोध घेतला जात आहे.

दरम्यान, मृत नारायण द्विवेदी यांच्या मुलीच्या छेडखणीच्या प्रकरणातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

महत्वाच्या बातम्या

Nagpur Crime Diary : मैत्रिणींना घरी बोलावून दोघांकडूनही अत्याचार, फेसबुक फ्रेन्डने केला घात 

Online Loan Scam : तरुणीची कॉलगर्ल म्हणून बदनामी, 'इन्स्टंट लोन' फसवणुकीचे 'चायना कनेक्शन'