Mumbai Rape Case LIVE UPDATE : मुंबई साकिनाका सामूहिक बलात्काराची घटना क्लेशदायक : छगन भुजबळ
Mumbai Rape Case : मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना काल समोर आली होती. या संतापजनक घटनेतील पीडितेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
मुंबई साकिनाका सामूहिक बलात्काराची घटना क्लेशदायक आहे. या घटनेतील पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचे ऐकून धक्का बसला असल्याची प्रतिक्रिया राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी दिली. राज्यात महिलांबाबत कठोर कायदे तरी अश्या घटना घडतात. सदर खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणार. प्रसंगी विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या सारख्या वकिलांची नियुक्ती करून आरोपींना कठोर शासन करू अशी ग्वाही राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव मतदार संघात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान पाहणी दौऱ्यासाठी भुजबळ आले असता नुकसानग्रस्तांना कोकण, सांगली, कोल्हापूरप्रमाणेच मदत दिली जाणार असल्याचे भुजबळांनी स्पष्ट केले.
मुंबई : साकीनाका परिसरात महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणं हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेविषयी संपूर्ण माहिती घेतली असून पोलीस आयुक्तांशी देखील ते बोलले आहेत. झालेली घटना निंदनीय आहे. हे कृत्य करणाऱ्या गुन्हेगारास कठोरात कठोर शासन केले जाईल. यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅकवर चालवून पीडितेला न्याय मिळवून दिला जाईल असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी तातडीने तपासाला गती देण्याचे निर्देश दिल्याचेही सांगितले.
मुंबईतील महिला अत्याचार प्रकरणात आरोपी अटकेत आहेत पण शक्ती कायदा आणखी कठोर करण्याची गरज असून राज्य सरकार त्यादृष्टीने प्रयत्न करत आहे- शंभूराज देसाई, गृह राज्यमंत्री
साकीनाका अत्याचार घटनेत पीडित महिलेचा मृत्यू झाला असून आतापर्यंत केवळ एका आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या घटनेची दखल आता राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली आहे. या प्रकरणी सर्व आरोपींना अटक करा आणि पीडितेच्या कुटुंबियांना मदत करा अशा आशयाचं पत्र राष्ट्रीय महिला आयोगाने मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलं आहे.
हे सरकार निर्लज्ज झालं असून आतातरी राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी क्शन प्लॅन आखला पाहिजे असं विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर म्हणाले.
दुःखद घटना आहे, यामध्ये चार्टशीट लवकर दाखल झाली पाहिजे, लवकर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवला पाहिजे, सरकार त्यादृष्टीने पावले टाकत आहेत, या घटनेचे समर्थन कोणी करत नाही आणि जो आरोपी आहे त्याला देखील वाचवायचा प्रयत्न कोणीही करत नाही- नवाब मलिक
साकीनाका अत्याचार प्रकरण: गृहमंत्री आणि महाराष्ट्र सरकार विरोधात काही लोकांची रुग्णालयात निदर्शने आणि घोषणाबाजी सुरू
साकिनाका घटनेवर मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे पत्रकार परिषद घेणार आहेत,दुपारी 3 वाजता,आयुक्त कार्यालयात ही पत्रकार परिषद होणार आहे
सरकारनं जबाबदारी स्वीकारायला पाहिजे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री वळसे पाटील यांनी चर्चा करून कारवाई करावी. राज्यात काय चाललंय एकामागोमाग एक घटना होत आहेत . आम्ही काही बोललो का बोलायचं की आम्ही राजकारण करतो हे योग्य नाही राज्यात कायद्यचा धाक राहिला नाहीय. शक्ती कायदा आणणार होते त्याच काय झालं, असा सवाल विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे.
आम्हाला माफ कर ताई - चित्रा वाघ
पीडितेच्या मृत्यूचं वृत्त कळल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे की, साकीनाका पिडीतेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. माफ कर ताई आम्हाला कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही.
पण या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचं घेणं देणं नाही. त्यांच्यासाठी तुझा मृत्यू म्हणजे फक्त अजून 1 नंबर. लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेताना. नाही वाचवू शकलो तुला, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काल म्हटलं होतं की, एका आरोपीला आता अटक केली आहे. पण मला खात्री आहे की यात आणखी नावं समोर येतील. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महिलांची बोटं छाटली जात आहेत, कुठं एफआयआर नोंदवली जात नाही. गणरायानं या सरकारला सद्बुद्धी द्यावी, महिला आणि मुलींवरील अत्याचारावर फक्त भाषणं करण्याऐवजी त्यावरील कायद्यांची प्रभावी अमलबजावणी व्हावी, असं वाघ म्हणाल्या.
Mumbai Rape Case : मुंबईतील उपनगर साकीनाका येथे एका टेम्पोत 32 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना काल समोर आली होती. या संतापजनक घटनेतील पीडितेचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी सांगितलं की, राजावाडी हॉस्पिटलमध्ये पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अत्याचारानंतर महिलेला अमानुषपणे मारहाण केल्याची घटना समोर आली होती. पीडित महिलेवर आधी टेम्पोमध्ये बलात्कार करण्यात आला आणि नंतर तिला बेदम मारहाण करण्यात आली. यात महिलेची प्रकृती गंभीर झाली होती.
पार्श्वभूमी

या प्रकरणी आरोपीला घटनेच्या काही तासांच्या आत अटक करण्यात आलं आहे. पोलिसांनी सांगितलं होतं की, शुक्रवारी पहाटे पोलिस नियंत्रण कक्षाला फोन आला की खैराणी रोडवर एक पुरुष एका महिलेला अमानुषपणे मारहाण करत आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी घटनास्थळी रक्ताने माखलेल्या महिलेला महानगरपालिका प्रशासित राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले होते.
आम्हाला माफ कर ताई - चित्रा वाघ
पीडितेच्या मृत्यूचं वृत्त कळल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे की, साकीनाका पिडीतेची मृत्युशी झुंज अपयशी ठरली. माफ कर ताई आम्हाला कुठल्या वेदनेतून गेली असशील याची कल्पनाही करवत नाही.
पण या मुर्दाड सरकार व व्यवस्थेला याचं घेणं देणं नाही. त्यांच्यासाठी तुझा मृत्यू म्हणजे फक्त अजून 1 नंबर. लाज वाटते सावित्रीच्या लेकी म्हणवून घेताना. नाही वाचवू शकलो तुला, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काल म्हटलं होतं की, एका आरोपीला आता अटक केली आहे. पण मला खात्री आहे की यात आणखी नावं समोर येतील. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. महिलांची बोटं छाटली जात आहेत, कुठं एफआयआर नोंदवली जात नाही. गणरायानं या सरकारला सद्बुद्धी द्यावी, महिला आणि मुलींवरील अत्याचारावर फक्त भाषणं करण्याऐवजी त्यावरील कायद्यांची प्रभावी अमलबजावणी व्हावी, असं वाघ म्हणाल्या.
कठोरात कठोर शिक्षा केली जाईल गृहमंत्री : दिलीप वळसे पाटील
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले होते की, याप्रकरणी एकाला अटक करण्यात आलेली आहे. त्याला कठोरात कठोर शिक्षा केली जाईलच, पण त्यापुढे जाऊन यात आणखी कोणाचा सहभाग आहे का? याचा ही तपास करण्याच्या सूचना पोलिसांना दिलेल्या आहेत. तसा अहवाल वेळोवेळी पोलीस सादर करतील, असं वळसे पाटील म्हणाले.
दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी- देवेंद्र फडणवीस
या घटनेवर संताप व्यक्त करताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबईतील साकीनाका भागात निर्भयासारखी घटना ऐकून मन सुन्न झाले. कलम 144 फक्त गणेशभक्तांसाठीच का? असा सवाल त्यांनी केला आहे. वाढते महिला अत्याचार थांबविण्यासाठी कोणते कलम आणि केव्हा लावणार? असा सवाल करत दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे म्हणाल्या होत्या की, पीडितेची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. ती बेशुद्ध आहे. एक शस्त्रक्रिया झाली आहे. मध्यरात्री हा प्रकार झाला आहे. या प्रकरणी आरोपी देखील पकडला गेला आहे. हे क्लेषदायक आहे, संतापजनक आहे. वाईटातली वाईट शिक्षा त्या आरोपीला मिळाली पाहिजे. त्या महिलेला त्वरित मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी आम्ही बोलू असं कायंदे म्हणाल्या.
आरोपीला भादंविच्या कलम 307, 376 अंतर्गत अटक करण्यात आली
काही पुराव्यांच्या आधारे आरोपीला भादंविच्या कलम 307 (खुनाचा प्रयत्न) आणि 376 (बलात्कार) अंतर्गत अटक करण्यात आली आहे. घटनेसंबंधी पुढील तपास सुरू आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -