Mumbai Police Action In Nashik  : मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोठी कारवाई करत 300 कोटींचे अमली पदार्थ (Drugs) जप्त केले आहेत. यामध्ये मुंबई पोलिसांकडून 150 किलोपेक्षाही अधिक ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. नाशिक रोडवरील शिंदे गाव एमआयडीसीमध्ये एमडी ड्रग्जच्या (MD Drugs) फॅक्टरीवर छापेमारी करून मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. नाशिक ड्रग्जचे पुण्यातील ससून रुग्णालयातील ड्रग्ज कनेक्शन आहेत का? याचा देखील तपास मुंबई पोलिस करणार आहेत.  


मुंबई पोलिसांकडून नाशिकमधल्या अंमली पदार्थाच्या कारखान्यात धाड मारत करण्यात आलेल्या या कारवाईत एकूण 12 जणांना अटक करण्यात आली आहे. नाशिक रोडवरील शिंदे गाव एमआयडीसीमध्ये एमडी ड्रग्जच्या फॅक्टरीवर मुंबई पोलिसांनी छापा टाकला. सुमारे 300 कोटींचे दीडशे किलोपेक्षा अधिक ड्रग्ज पोलिसांनी हस्तगत केले असून मुंबईसह देशाच्या वेगवेगळ्या भागातून बारा जणांची धरपकड केली आहे. कालच्या कारवाई मध्ये पकडण्यात आलेल्या झिशान इक्बाल शेख असे आरोपीचे नाव आहे.