Mumbai Police : मुंबई गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सोलापूर येथून दोन महिलांना अटक केली आहे. पोलिसांनी अपहरण झालेल्या एक वर्ष एक महिन्याच्या एका चिमुरडीची सुटका केली आहे. भीक मागण्यासाठी लहान मुलांचा वापर करण्यासाठी बाळांची चोरी होत असल्याचं समोर आलंय. गेल्या आठवड्यात सांताक्रूझ येथून एका चिमुरडीचे अपहरण करण्यात आले होते आणि त्याबाबत सांताक्रूझ पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. एका आठवड्यातली दुसरी घटना आहे. मुस्कान शेख ही तक्रारदार आहे तिने तक्रार दिली होती. ती फुटपाथवर वास्तव्यास असते आणि तिची 1 वर्षाची मुलगी गायब झाली होती. मुलगी हरवल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. 30 ऑक्टोबरची घटना आणि 31 ऑक्टोबरला अपहरणचा गुन्हा दाखल झाला होता.
मुलं शोधण्यासाठी टीम तयार करण्यात आली होती. गुन्हे शाखेच्या पथकासह स्थानिक पोलीस सीसीटीव्ही फुटेजचा मदतीने पीडित मुलीचा शोध घेत आरोपीचा शोध लावला. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपी सांताक्रूझ रेल्वे स्टेशनवर जाऊन नालासोपारा येथे गेल्याचे पोलिसांना आढळले. मध्येच पोलिसांनी तिच्या फोटोवरून तिची चौकशी सुरू केली. आणि ती नेहरू नगरमध्ये राहते असे समजले. पोलिस तिच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी ती ट्रेनमध्ये बसली आणि तेलंगणाला निघून गेली. गुन्हे शाखेचे पथक तेलंगणला जाण्यासाठी निघाले असता आरोपी ट्रेनमध्ये चढून सोलापूरला येत असल्याचे त्यांना आढळले. त्यानुसार गुन्हे शाखेने आरोपीचे छायाचित्र आरपीएफ कर्मचाऱ्यांसोबत शेअर केले आणि दोघांना सोलापूर येथे अटक करण्यात आले आणि नंतर गुन्हे शाखेने त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी तपास करत काळ त्या मुलीला रेस्क्यू केलं. शरिफा शेख आणि सुजाता पासवान अशी दोन्ही अटक आरोपींची नावे आहेत.
मुलीचे नाव फातिमा आणि तीला आज त्याचा पालकांचा ताब्यात देण्यात आले. तपासात अस दिसून येतंय की हे मुलं विकण्यासाठी नाही तर भीक मागण्यासाठी वापरण्यात येणार होतं, असे दिसून येतंय त्या अनुषंगाने आम्ही आता चौकशी करत आहोत. गेल्या 15 दिवसात ही तिसऱ्या चिमकल्याची सुटका पोलिसांनी केली आहे, असे मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सांगितलं.
दिनांक 15 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर या कालावधीत मुंबई शहरामध्ये राबविण्यात आलेल्या "ऑपरेशन रि-युनाईट" मध्ये एकूण 480 बालके मिळून आले आहेत. मुंबई शहरामधून हरविलेल्या व अपहरण झालेल्या 18 वर्षाखालील मुले व मुली यांचा शोध व तपास करण्यासाठी मुंबई शहरामध्ये 'ऑपरेशन रि-युनाईट" चे आयोजन करण्यात आलेले होते. सदर कालावधीमध्ये मुंबई शहरातून 18 वर्षाखालील हरविलेली जास्तीत जास्त बालके मिळून येणासाठी पोलीस ठाणे स्तरावर जास्तीत जास्त प्रयत्न करण्यात आले. सदर मोहिम यशस्वी होण्यासाठी मुंबई मधील नागरिकांची,पोलीस व बालकांसंदर्भात करणा-या विविध शासकीय व अशासकीय संस्था यांची मदत घेण्यात आली.
रेकॉर्ड वरील मिळून आलेली बालके:
मुले : 68
मुली : 135
रेकॉर्डवर नसलेली परंतू मिळून आलेली बालके:
मुले: 154
मुली : 122
मिळून आलेले बाल कामगार:
एकूण: 480
मुले - 230
मुली - 257